शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
3
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
4
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
5
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
6
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
7
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
8
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
9
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
11
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
12
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
13
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
14
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
15
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
16
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
17
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
18
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
19
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
20
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

वन्यजीवांची शिकार करणारी टोळी लागली वर्धा वन विभागाच्या गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 5:00 AM

वन्यजीवांची शिकार करणारी यवतमाळ जिल्ह्यातील टोळी वर्धा-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येऊन शिकार करीत असल्याची माहिती पोहणा वनक्षेत्राचे वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांना मिळाली. त्यानंतर वनरक्षक सज्जन यांनी सापळा रचून दुचाकीने येत असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील साहित्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात वन्यजीव आढळून आलेत.

ठळक मुद्देआरोपींकडून अकरा वन्यप्राण्यांसह दुचाकी अन् इतर साहित्य हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कामगिरी करून वन्यजीवांची शिकार करणाऱ्या तीन सदस्यीय टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल अकरा वन्यजीवांसह दुचाकी व इतर साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजय महेबूब काळे (२७), निळकंठ पंजाब पवार (२८) दोन्ही रा. गोपालनगर, ता. राळेगाव, जि. यवतमाळ तसेच अनिल गुलाब पवार रा. उंबरविहीर, ता. राळेगाव, जि. यवतमाळ, असे अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात आले.वन्यजीवांची शिकार करणारी यवतमाळ जिल्ह्यातील टोळी वर्धा-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येऊन शिकार करीत असल्याची माहिती पोहणा वनक्षेत्राचे वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांना मिळाली. त्यानंतर वनरक्षक सज्जन यांनी सापळा रचून दुचाकीने येत असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील साहित्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात वन्यजीव आढळून आलेत. आरोपींकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नऊ जिवंत ससे, एक तितर, एक लाव्हा, एमएच १४ ईटी ०३७८ क्रमांकाची दुचाकी, दोन मोबाइल, बॅटरी व टॉर्च, वन्यप्राणी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम ९, ३९(२), ५२, ४८(अ), २(३६),५९(१)(क), ६० अन्वये गुन्ह्याची नोंद घेत त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक वनरक्षक भीमसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनात वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर यांच्या निर्देशावरून वनपाल सचिन कापकर, वनरक्षक मनेशकुमार सज्जन, यू. एल. पवार, अमोल पिसे, संजय गायकवाड, अशपाक पठाण यांनी केली.वन्यजीवांची करुणाश्रमात रवानगीया कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वन्यजीवांना पिपरी (मेघे) येथील पीपल फॉर ॲनिमलच्या करुणाश्रमात ठेवण्यात आले आहे. वन्यजीवप्रेमी आशिष गोस्वामी, कौस्तुभ गावंडे यांच्यासह त्यांचे सहकारी या वन्यजीवांची निगा घेत आहेत.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग