तंबाखूमुक्ती अभियानांतर्गत राज्यातील नऊ व्यक्तींना अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 07:00 AM2020-11-12T07:00:00+5:302020-11-12T07:00:09+5:30

Wardha News Tobacco Free Campaign राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर तंबाखूमुक्ती अभियान राबविले जात आहे.

Grants to nine persons in the state under the Tobacco Free Campaign | तंबाखूमुक्ती अभियानांतर्गत राज्यातील नऊ व्यक्तींना अनुदान

तंबाखूमुक्ती अभियानांतर्गत राज्यातील नऊ व्यक्तींना अनुदान

Next
ठळक मुद्देटोबॅको फ्री इंडिया पुरस्काराने सन्मानित नरोत्तम सेखसरिया व सलाम मुंबई फाउंडेशनचा उपक्रम

 लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्याच्या शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर तंबाखूमुक्ती अभियान राबविले जात आहे. हे अभियान सक्षम करण्याकरिता सहकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि व्यक्तींना टोबॅको फ्री इंडिया पुरस्कार आणि अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात राज्यातील ९ व्यक्तींचा समावेश आहे.

सलाम मुंबई फऊंडेशनच्यावतीने २००७-०८ पासून राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवित आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना सुरक्षित व आरोग्यपूर्ण भविष्यासाठी तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम शालेय आणि गाव स्तरावर अधिक मजबूत व्हावा याकरिता नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन ही सेवाभावी संस्थाही विकासात्मक कार्य करीत आहे. तंबाखू नियंत्रण कार्यास आधिक बळकटी देण्याकरिता दर दोन वर्षांनी देशभरातून पाच सेवाभावी संस्थांची आणि व्यक्तींची निवड केली जाते.  यावर्षी पाच सेवाभावी संस्था आणि दहा व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना मिळणाऱ्या अनुदानातून समाजाचे आरोग्य चांगले राहावे, सर्व मुले आणि समाज तंबाखूमुक्त व्हावा यासाठी खर्च केले जातात. यावर्षी राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. साधना तायडे व द युनियनचे क्षेत्रीय उपसंचालक डॉ. राणा सिंग यांच्या उपस्थितीत पुरस्कार व अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.

देशातील सात राज्यात कार्य
तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील १ लाख २१ हजार ७६० शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या उपक्रमत आजापर्यंत ५८५ सेवाभावी संस्था सहभागी झाल्यात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून  राज्यात १२ हजार १२१ डीएड आणि बीएड विद्यार्थी, १५ हजार ३८९ पोलीस प्रशिक्षित करण्यात आलेत. सलाम मुंबई फाउंडेशनच्या कार्याची महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दखल घेऊन महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार संस्थेला प्रदान केला आहे. महाराष्ट्रातील यशानंतर आता सलाम मुंबई फाउंडेशनने भारतातील सात राज्यांत तंबाखूमुक्त शाळांचे काम स्थानिक शासनासोबत सुरू केले आहे.

या व्यक्तींना मिळाले अनुदान
तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याकरिता राज्यातील ९ व्यक्तींना अनुदान देण्यात आले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सरोज जगताप व ज्योती देशमुख, साताऱ्याचे अनिल नामदेव जाधव, नंदुरबारचे रवी गोसावी, यवतमाळ येथील कैलास गव्हाणकर, वर्ध्याचे नरेश वाघ, कोल्हापुरातील शशिकांत कदम, धुळ्याचे पंकज शिंदे व सांगलीचे रामचंद्र टोणे यांचा समावेश आहे.

अनुदान मिळालेल्या सामाजिक संस्था
मुव्हमेंट फॉर अल्टनेर्टीव्ह अ‍ॅण्ड युथ अव्हेरणेस (कर्नाटक), एफर्ट संस्था (आंध्र प्रदेश), शिक्षित रोजगार केंद्र समिती (राजस्थान), बुंदेलखंड सेवा संस्थान (उत्तर प्रदेश) व बालाजी सेवा संस्थान (उत्तराखंड) या सेवाभावी संस्थांना अनुदान देण्यात आले आहे.

Web Title: Grants to nine persons in the state under the Tobacco Free Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.