आरोग्य कर्मचारी चकरी आंदोलनाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:57 AM2018-10-15T00:57:50+5:302018-10-15T00:58:02+5:30
जि.प. अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या बाबत १७ एप्रिलला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक पार पडली. त्यावेळी आठ दिवसात मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण सहा महिने लोटूनही कुठलीही कार्यवाही न झाल्याने येत्या २२ आॅक्टोबरपर्यंत मागण्या निकाली काढा अन्यता चकरी आंदोलन करण्यात येईल,.....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जि.प. अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या बाबत १७ एप्रिलला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक पार पडली. त्यावेळी आठ दिवसात मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण सहा महिने लोटूनही कुठलीही कार्यवाही न झाल्याने येत्या २२ आॅक्टोबरपर्यंत मागण्या निकाली काढा अन्यता चकरी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांना सादर केलेल्या निवेदनातून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
आरोग्य विभागात उपकेंद्र कार्यरत अर्धवेळ स्त्री परिचर यांना ५ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. ते तात्काळ देण्यात यावे. आरोग्य सेविकेच्या रिक्त पदावर कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविकेची सेवा नियमित करावी. आरोग्य पर्यवेक्षक रिक्त पदावर आरोग्य सहाय्यक स्त्री-पुरुष यांना पदोन्नती देण्यात यावी. आरोग्य सहाय्यक रिक्त पदावर आरोग्य सेविका अथवा सेवक या संवर्गातून पदोन्नती देण्यात यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा व चौथा शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात यावी. शासन निर्णय ६ आॅगस्ट २००७ च्या आकृतीबंधा नुसार आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक मंजूर पदे त्वरित भरण्यास यावे, लेखाशिर्ष २२११ चे मंजूर रिक्त पदे त्वरित भरावे, शासन निर्णय १७ जानेवारी २०१३ नुसार मंजूर पदे त्वरीत भरावे. आरोग्य सेवक दिलीप धुडे रा. कामठी यांचे आंशदायी पेन्शन योजनेतील पैशाचा घोळ दुर करुन इतर कर्मचाऱ्यांच्या कपात पैसाची चौकशी करावी. आरोग्य कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक समस्या तात्काळ निकाली काढाव्या. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या १२ व २४ वर्षांची कालबद्ध पदोन्नती त्वरीत द्यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
सदर मागण्यांवर येत्या २२ रोजीपर्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या निकाली काढाव्या अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांना निवेदन देताना संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ तेलतुंबडे, नलीनी उबदेकर, दीपक कांबळे, वंदना उईके, विजय जांगडे, सुजाता कांबळे, संजय डफरे, अनुराधा परळीकर, रतन भेंडे, रंगराव राठोड, विठ्ठल केवटे, हेंमत उघडे, अमित कोपुलवार, विकास माणिककुडे, ममता लोखंडे, निलेश साटोणे, संजय डगवार, प्रभाकर सुरतकर, बाबाराव कनेर, श्याम जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाºयांची उपस्थिती होती.