लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्ग कोपात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांवर आता गोवंशीय जनावराच्या ‘लम्पी त्वचा आजारा’ चे नवे संकट ओढवले आहे. जिल्ह्यामध्ये ९ हजार ३७७ जनावरांना बाधा झाल्याने उर्वरित जनावरांना तात्काळ प्रतिबंधित लसीकरण गरजेचे असून त्या अनुशंगाने पशुसंवर्धन विभागाने उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. पण, पशुसंवर्धन विभागाकडे लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणात अडचणी येत असल्याची ओरड होत आहे.आठही तालुक्यामध्ये २ लाख ७५ हजार गोवंशीय जनावरे आहेत. त्यापैकी ९ हजार ३७७ जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसिज’ ची बाधा झाली आहे. ज्या परिसरात बाधित जनावरे आहे त्या गावामध्ये तसेच बाधित गावांपासून ५ किलो मीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व म्हैस वर्गीय बाधित जनावरांना वगळता लसीकरण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन खात्याने दिले आहेत. त्यामुळे ९ हजार ३७७ बाधित जनावरे वगळता इतरांना लसीकरण करणे बंधनकारक आहे.पशुसंवर्धन विभागाने खरेदी केलेली ४६ हजार ५००, राज्य शासनाच्या दवाखान्यातील १५ हजार ५०० आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून प्राप्त झालेली २० हजार अशी एकूण ८० हजार ३०० लस उपलब्ध असून आतापर्यंत ५२ हजार १०० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. अद्यापही २ लाख १३ हजार ५२३ जनावरे लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. सध्यातरी पशुसंवर्धन विभागाकडे अपुरा लस साठा असल्याने गोपालकांची लसीकरणासाठी भटकंती करावी लागत आहे.पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाची चालढकल‘लम्पी स्कीन डिसिज’चा प्रकोप वाढायला लागलाच जिल्हा परिषद पशुसवंर्धन विभागा अंतर्गत येणाºया परिसरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, राज्य शासनाच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाअंतर्गत येणाºया पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये अद्यापही लसीकरण सुरु झाले नाही. याचा परिणाम खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कांरजा परिसरातच पडल्याने गोपालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयांतर्गत एक जिल्हास्तरी, ५ तालुकास्तरीय तर १५ ग्रामीण दवाखान्यांचा समावेश आहेत. या विभागाने १ लाख रुपयांच्या निधीतून १५ हजार लसी खरेदी केल्या असल्या तरी लसीकरणाकरिता चालढकल केली जात असल्याने आजार बळावण्याची शक्यता आहे.कारंजा तालुक्यात पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाअंतर्गत येणाºया दवाखान्यातून अनेक गावांमध्ये लसीकरण झाले नसल्याचे गोपालकांकडून सांगण्यात आले आहे. लसीकरण न होणे ही गंभीर बाब असून पशुपालकांकरीत जि.प.आवश्यक निर्णय घेईल. उपायुक्त कार्यालयाला काही अडचणी असल्यास त्यांनी सांगाव्या.सरिता गाखरे, अध्यक्ष, जि.प.वर्धागावोगावी शिबिर आयोजित करुन तसेच पथकाव्दारे गावोगावी जाऊन लसीकरण केले जात आहे. नियमित लसीकरण व बाधित जनावरांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यात कुठेही लसीचा तुटवडा नाही. हिंगणघाटामध्येही लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.वर्धाजनावरांवर ‘लम्पी स्कीन डिसिज’चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने गोपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आधीच शेतकरी संकटात असताना आता हे नवे संकट ओढवले आहे. त्यामुळे जे जनावरे बाधीत नाही, त्यांना प्रतिबंधक लस देण्यासोबतच बाधित जनावरांवर उपचार करण्यासंदर्भात सोनेगाव (खुनकर) येथे शिबिर घेण्यासंदर्भात स्थानिक पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांना म्हटले असता त्यांनी सध्या लस उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे परिसरातील जनावरांना लसीकरण करता आले नाही. त्यामुळे लसीकरणाचा तुटवडा दूर करण्याची गरज आहे.धनराज तेलंग, सदस्य, जिल्हा परिषद
लम्पी कोपात लसीकरणासाठी गोपालकांचा हंबरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 5:00 AM
आठही तालुक्यामध्ये २ लाख ७५ हजार गोवंशीय जनावरे आहेत. त्यापैकी ९ हजार ३७७ जनावरांना ‘लम्पी स्कीन डिसिज’ ची बाधा झाली आहे. ज्या परिसरात बाधित जनावरे आहे त्या गावामध्ये तसेच बाधित गावांपासून ५ किलो मीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व म्हैस वर्गीय बाधित जनावरांना वगळता लसीकरण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन खात्याने दिले आहेत. त्यामुळे ९ हजार ३७७ बाधित जनावरे वगळता इतरांना लसीकरण करणे बंधनकारक आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात २ लाख ७५ गोवंश : ५२ हजार जनावरांना लसीकरण, पशुसंवर्धन विभागाकडे लसीचा तुटवडा?