भारत-थायलंड सांस्कृतिक संबंध प्रगाढ करणारा त्रिभाषी कोष
By Admin | Published: May 11, 2014 12:33 AM2014-05-11T00:33:55+5:302014-05-11T00:33:55+5:30
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात थायलंडच्या विद्यार्थ्यानी पर्यटन क्षेत्राचा त्रिभाषी कोष तयार केला असून यातून भारत-थायलंड या उभय देशातील ...
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात थायलंडच्या विद्यार्थ्यानी पर्यटन क्षेत्राचा त्रिभाषी कोष तयार केला असून यातून भारत-थायलंड या उभय देशातील संबंधाना ऊजाळा मिळणार असल्याचे प्रतिपादन शोध निर्देशक डॉ. अन्नपूर्णा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापकांसह थायलंडच्या संशोधकांचा समावेश होता. हिंदी-थाई-इंग्रजी या तीन भाषांचा समावेश असलेला त्रिभाषी कोश एम.ए.हिंदी, अनुवाद प्रौद्योगिकी विषयाचे शिक्षण घेत असलेल्या वुत्थिफोड थविन या विद्यार्थ्यांसह शोध निर्देशक डॉ. अन्नपूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण कोष तयार केला आहे. या कोषाबाबत माहिती देताना संशोधक म्हणाले, यातून अनेक तथ्य प्रदर्शित झाले आहेत. या संशोधनातून सांस्कृतिक पर्यटन, पर्यावरण पर्यटन, शिक्षण आणि धार्मिक पर्यटन यांची सांगोपांग चर्चा करण्यात आली आहे. या कोषात जवळपास ५०० शब्दांचा वापर करण्यात आला आहे. ज्यात हिंदी-थाई आणि इंग्रजी शब्दांचा समावेश आहे. भारत आणि थायलंड या दोन देशात सामाजिक, सांस्कृतिक साधर्म्य आहे. ते भाषा व शब्दांमधून प्रदर्शित होते. यावेळी काही उदाहरण देण्यात आले. जसे, हिंदीत पूजा तर थाई भाषेत बूजा, नरक ला नरोक, असे संबोधले जाते. पर्यटन एक आंतरराष्ट्रीय विषय आहे. उभय देशात हा व्यापक विषय झाला आहे. भारताच्या दृष्टीने बुद्धगया, सारनाथ, हिमालयाच्या रांगा, गंगा नदी इत्यादी ठिकाणे पर्यटनाला वाव देणार्या आहेत. येथे थायलंडचे पर्यटक भेट देतात. थायलंडही भारतीय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या शोधातून सांस्कृतिक पर्यटनाच्या संदर्भात असे मांडण्यात आले की, भारतात दिवाळी आणि संक्रात हे सण साजरे केले जातात. तसे थायलंडमध्ये दिवाळीला लॉय-क्र-थाड आणि संक्रांतीला सोंक्रांत या नावाने सण साजरे करण्यात येते. लॉय-क्र-थाड हा उत्सव कार्तिक पौर्णिमेला साजरा करतात. हा त्यांचा बारावा महिना असतो. या सणाला केळीच्या पानांपासून किंवा कागदापासून छत्री बनवतात आणि त्यात दिवा व मोमबत्ती लावून ती नदी किंवा तलावात सोडली जाते. थायलंडच्या पर्यटन विकासात हिंदी सिनेमाची मोलाची भर घातली आहे. राम आणि रावण यांच्यावर आधारित नाटकांचे प्रदर्शन होते. लोककलावंत नाटके सादर करतात अशी माहिती दिलि. या कार्यक्रमाला विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर सांस्कृतिक, धार्मिक विषयावर चर्चा करणात आली.(स्थानिक प्रतिनिधी)