लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जनहीत मंच मागील ६ वर्षांपासून समाज कार्यात काम करणारी वर्ध्याची संस्था आहे. संस्थेने स्वछता अभियान, वाहतूक व्यवस्था व त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, बालकावर होणारे लैंगिक आत्याचार याबदलच्या कार्यशाळा, गरजुंना साहित्य वाटप, कपडा बँक, नवरात्री उत्सव दरम्यान रात्री स्वछता मोहीम, यासारखे जनहितार्थ कार्य केले असून ते सध्याही सुरू आहेत. जनहित मंच खºया अर्थाने नागरिकांचे हित जोपासणारी संस्था आहे, असे प्रतिपादन जनहीत मंचाचे अध्यक्ष सतीश बावसे यांनी केले.जनहित मंच वर्धाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रम मुक्तांगण टेकडीवर पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक चोधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जनहीत मंचाचे सचिव डॉ. आसमवार यांनी जनहीत मंचाच्या महत्वाकाशी प्रोजेक्ट बद्दल माहीती देताना महावीर उद्यान यांची उत्पती व त्यावर जनहित मंचाने केलेले कार्य व महावीर उद्यान याची आजची स्थिती या विषयी माहीती दिली. जनहीत मंचाच्या कार्याची दखल मुख्यमंत्र्यांनीही कशी घेतली या बद्दल सांगताना ते म्हणाले, वर्धा नागपूर टूरीझम कोरीडोओरची कल्पना सर्वप्रथम जनहित मंचाने अभ्यास करून प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविला. त्याच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यानी त्याचे नामकरण हिंगणी-हिंगणा टूरीझम कोरीडोओर करून त्याचावर समिती स्थापन केली. मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेसी यांना त्याची कामगीरी सोपावली आहे. या प्रोजेक्ट वर सध्या काम सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या २ कोटी, ४ कोटी व १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमामध्ये जनहीत मंचाने सहभाग घेवुन वर्धेकरिता एक सुंदर क्षेत्र निर्माण केले. त्याचे फलीत म्हणून मुक्तांगण आज सर्वासमोर उभे आहे, असे सांगितले.यावेळी ठाणेदार अशोक चोधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार डॉ. मकरदे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी बहारदार शायरीही सादर केली. कार्यक्रमाला पवन बोधनकार यांच्यासह जनहित मंचाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी एका पेक्षा एक बहारदार गितांचा कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमाला वर्धेकरांची उपस्थिती होती.
जनहित मंच ही खऱ्या अर्थाने वर्धेकरांचे हित जोपासणारी संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 1:01 AM
जनहीत मंच मागील ६ वर्षांपासून समाज कार्यात काम करणारी वर्ध्याची संस्था आहे. संस्थेने स्वछता अभियान, वाहतूक व्यवस्था व त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, बालकावर होणारे लैंगिक आत्याचार याबदलच्या कार्यशाळा, गरजुंना साहित्य वाटप, कपडा बँक,........
ठळक मुद्देसतीश बावसे : विविध कार्याची दिली माहिती