कृती आराखडा अद्ययावत ठेवा

By admin | Published: May 24, 2015 02:33 AM2015-05-24T02:33:33+5:302015-05-24T02:33:33+5:30

जिल्ह्यातील गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास सर्वोतोपरी पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करून अंमलबजावणीस सुरुवात करा.

Keep the action plan updated | कृती आराखडा अद्ययावत ठेवा

कृती आराखडा अद्ययावत ठेवा

Next

वर्धा : जिल्ह्यातील गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास सर्वोतोपरी पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करून अंमलबजावणीस सुरुवात करा. अद्ययावत पद्धतशीर प्रक्रिया (एसओपीएस), नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून पूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, पोलीस उपअधीक्षक आर. जी. किल्लेकर, उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर, स्मिता पाटील, तहसीलदार अजय झिले, सुभाष यादव, गजेंद्र बालपांडे, बी.आर. तीनघसे, मुख्याधिकारी मनोज शहा, अनिल जगताप, एच. डी. टाकरखेडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता टी. एस. शेतवार, बीएसएनएलचे आर.पी. साठोणे आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी भागवत म्हणाले, आपत्तीतील बाधितांचा पंचनामा करताना प्रत्येक बाधिताचा खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक याची नोंद घ्यावी. अतिवृष्टी, पूरपरिस्थितीची संभाव्य गावांची संपर्क यादी अद्ययावत ठेवावी. सर्व लाईट, जॅकेट, बोट, औषधी, अन्नसाठा, ब्लिचिंंग पावडर आदी साहित्य व्यवस्थित ठेवून त्याचे योग्य व्यवस्थापन करावे. तालुका पातळीवर समित्या स्थापन करून आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी अत्यंत कटाक्षाने पार पाडावी. सर्व यंत्रणांनी संपर्क क्रमांक अद्ययावत करुन नियत्रंण कक्षाकडे सोपवावित आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
तालुकास्तरावरील संबंधित यत्रंणांनी अद्ययावत पद्धतशीर प्रक्रिया (एसओपीएस), आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा संदर्भातील माहिती संबंधित संकेतस्थळावरही पाठवावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी करुन मान्सून पूर्व तयारी गतीने करावी, आरोग्य, पुरवठा, नगर परिषद, महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, दूरसंचार, वीज, एसटी, पाणी पुरवठा विभागाने बारकाईने नियोजन करुन नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा सादर करुन सादर करावा. असेही सांगितले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Keep the action plan updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.