लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम/पवनार : नामवंत कवी तथा वक्ते कुमार विश्वास यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचे आश्रम तसेच पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम गाठून गांधी व विनोबा भावे यांचे विचार समजावून घेतले. तसेच त्यांनी सेवाग्राम आश्रमात दैनंदिन प्रार्थनेत सहभागी होऊन बापूंना अभिवादन केले.पवनार येथील आश्रमात जावून कुमार विश्वास यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी त्यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या समाधी पुढे दोन मिनीट मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी त्यांनी पवनार आश्रम व आश्रमातील दैनंदिन कार्याची माहिती जाणून घेतली. तर सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमात त्यांनी सुरूवातीला आदी निवास, बा-कुटी, बापूकुटी, दप्तर, आखरी निवास आदीची पाहणी करून त्याबाबतची माहिती जाणून घेतली.तसेच आश्रमाच्या कार्य पद्धतीची आणि दैनिक कार्यक्रमाची माहिती त्यांनी जाणून घेतली. आश्रमचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांच्याशी त्यांनी चर्चा केली. अधीक्षक भावेश चव्हाण यांनी त्यांना आश्रमाची तसेच आश्रमातील विविध कार्याची माहिती दिली. त्यानंतर कुमार विश्वास यांनी सायंकाळच्या दैनंदिन प्रार्थनेत सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले.बापूंचे विचार आजही शक्तिशाली - विश्वासगांधीजी आश्रमाचा आत्मा आहे. आपण इतिहासाचा विद्यार्थी राहिल्याने गांधीजी आणि स्वातंत्र्य आंदोलनाचा अभ्यास आपण केला. ज्यांचा स्वातंत्र चळवळीत संबंध राहिला नाही, योगदान नाही ते टिपनी करतात. गांधी यांच्या हत्येत ज्यांचा हात राहिला, विचाराशी संबंध नाही ते पूज्य बापूचा जप करतात. बापूंच्या समाधीवर जाऊन नतमस्तक होतात. बापू व त्यांचे विचार आजही शक्तिशाली आहे, असे विचार यावेळी कुमार विश्वास यांनी व्यक्त केले.
कुमार विश्वास यांनी जाणले गांधी व विनोबांचे विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:35 AM
नामवंत कवी तथा वक्ते कुमार विश्वास यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचे आश्रम तसेच पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम गाठून गांधी व विनोबा भावे यांचे विचार समजावून घेतले.
ठळक मुद्देप्रार्थनेत झाले सहभागी : आश्रमाची जाणून घेतली माहिती