शेतकरी संपाला अत्यल्प प्रतिसाद

By admin | Published: June 2, 2017 01:59 AM2017-06-02T01:59:27+5:302017-06-02T01:59:27+5:30

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांकरिता राज्यात गुरुवारपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला. या संपात वर्धेतील

Lesser response to farmers' movement | शेतकरी संपाला अत्यल्प प्रतिसाद

शेतकरी संपाला अत्यल्प प्रतिसाद

Next

शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा खोडा : भाजी बाजारात स्थिती सामान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांकरिता राज्यात गुरुवारपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला. या संपात वर्धेतील शेतकरी सहभागी होतील असे वाटत असताना शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे या संपाला विशेष प्रतिसाद नसल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध ओतल्याशिवाय दुसरे कोणतेही आंदोलन झाले नाही. तर हिंगणघाट येथे शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना तर आष्टीत तहसीलदारांना स्वाभिमानी संघटनेच्यावतीने या संपात सहभागी होत असल्याचे निवदेन सादर केले. वर्धेत भाजी बाजारात सर्वच व्यवहार सुरळीत होते.
राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. यात सर्वच जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतील असे वाटत होते. मात्र शेतकरी आत्महत्यांनी ढवळून निघालेल्या या जिल्ह्यात या संपाचा विशेष परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे. सकाळी भाजी बाजारात या संपाचा परिणात दिसेल असे वाटत असताना सर्वच स्थिती सर्वसामान्य होती. येथे नित्याप्रमाणे सर्व व्यवहार सुरू होत. शेतातून काढण्यात आलेला शेतमाल घरीच सडविणार काय, असे म्हणत बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल बाजारात आणला होता. आर्थिक अडचणीचा फटका या शेतकऱ्यांना बसत असल्याने या संपाला त्यांच्याकडून नकार देण्यात आल्याचे देण्यात येत असल्याचे एकंदरीत चित्रावरून दिसून आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतले १५५ लिटर दूध
या संपादरम्यान जिल्ह्यात आंदोलन म्हणून केवळ काही दूध उत्पादकांनी त्यांच्या दुधाची विक्री न करता ते दूध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतले. या आंदोलनादरम्यान तब्बल १५५ लिटर दूध ओतण्यात आले. या आंदोलनात तळेगाव (टालाटुले) येथील डॉ. यशवंत सुरकार यांनी ६० लिटर दूध फेकले. तर भुगाव येथील निवृत्ती शेवड यांनी ५०, प्रितम नाखले यांनी ३०, दिनेश शास्त्रकार यांनी १५ लिटर दूध कार्यालयासमोर ओतले. शेतकऱ्यांनी सात दिवस संप पुकारल्याने या संपाच्या दिवसात दररोज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत दूध ओतणार असल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली. शिवाय शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास यंदाच्या हंगामात शेतीही पडिक ठेणार असल्याचे निवृत्ती शेवडे यावेळी म्हणाले. या आंदोलनात आपचे पप्पी साहू, प्रमोद भोमले सहभागी झाले होते. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे एक निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
राज्यातील शेतकऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. या संपात आपण सहभागी असल्याचे म्हणत शेतकरी संघटना व किसान क्रांतीच्या शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवदेनातून विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याची शिफारस त्यांनी केली. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन पड्या भावात विकावे लागत आहे. शिवाय तुरीचा एफएक्यू घसरत आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला खर्चावर ५० टक्के लाभ देत दर ठरविण्यात यावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, कृषी पंपाच्या देयकातून मुक्ती करावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, दुधाला ५० रुपये लिटरचा दर द्यावा, हमीभाव कमिटीच्या शिफारशीनुसार हमीभाव जाहीर करावा, आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे मधुसूदन हरणे, माजी आमदार सरोज काशिकर, प्रा. मधुकर झोटींग, विशाल गौळकार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील खडकी नरसापूर, वाघोली, सिरसोली येथील शेतकरी गुरुवारपासून संपावर जाणार असल्याचे निवदेन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा प्रमुख आशिष वाघ यांनी तहसीलदार गजभिये यांना सादर केले. यावेळी तालुका प्रमुख पवन नागपुरे, सागर निमजे, अंकुश ढवले, वैभव सोळंके, संदीप गाडगे, सुधीर पाथरे, ज्ञानेश्वर खैरकार उपस्थित होते.

Web Title: Lesser response to farmers' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.