लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताला ओळखले जाते. विविधतेने नटलेले हे राष्ट्र भारतीय संविधानाच्या अलौकीक वैशिष्ट्यांमुळे व लोकशाही तत्वांमुळे खंबीरपणे उभे आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद व घराणेशाहीसारख्या अमानवी बाबींमुळे लोकशाही तत्वाला खिळ बसत आहे. लोकशाहीचा उंच इमला वाचविण्यासाठी भारतीय नागरिकांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे असे, असे आवाहन लोक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सुनिल पाटणे यांनी काढले.स्थानिक यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ‘महाराष्टÑाचे राजकारण’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास विभाग प्रमुख डॉ. विरेंद्र बैस तर पाहूणे म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र बेले, प्रा. एकनाथ मुरकुटे, प्रा. प्रविण घोडखांदे, प्रा. राजेश भटकर, प्रा. वैशाली देशमुख मंचावर उपस्थित होते. यावेळी डॉ. विरेंद्र बैस म्हणाले की, प्रशासकीय सेवा हे सुध्दा लोकशाही बळकट करणारे अत्यंत महत्वाचे क्षेत्र आहे. याक्षेत्राकडे वळून विद्यार्थ्यांनी देश सेवेचे महान कार्य करावे, असे सांगितले. डॉ. रवींद्र बेले यांनी प्रास्ताविकातून राज्यशास्त्र विभागात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले मुकेश भावे, उपाध्यक्ष योगिता मस्के, सचिव मीनाक्षी उडाण, कोषाध्यक्ष प्रविण धोटे, सहसचिव चंदन शेंडे व सदस्यांचे प्रमुख अतिथींच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रामेश्वरी लिल्लारे हिने तर आभारप्रदर्शन योगिता मस्के हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रितम मून, मंगेश खडसे, सागर डोळे, दीक्षा माटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
लोकशाही बळकटीसाठी नागरिकाने पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:15 AM
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताला ओळखले जाते. विविधतेने नटलेले हे राष्ट्र भारतीय संविधानाच्या अलौकीक वैशिष्ट्यांमुळे व लोकशाही तत्वांमुळे खंबीरपणे उभे आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद व घराणेशाहीसारख्या अमानवी बाबींमुळे लोकशाही तत्वाला खिळ बसत आहे.
ठळक मुद्देसुनील पाटणे : यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन