दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनात माँ कस्तुरबा गांधी यांचे स्थान फार महत्त्वाचे होते. जीवनात जे कार्य केले ते केवळ कस्तुरबांच्या सहकार्यामुळेच, असे खुद्द बापू म्हणत. त्यामुळे कस्तुरबा आणि सेवाग्राम यांचे अतुट नाते राहिले आहे. आश्रमातील कार्य आणि स्वातंत्र्य चळचळ यात त्यांची भूमिका निर्णायक होती. त्यामुळे कस्तुरबा गांधी यांचे हे महत्त्व येणाऱ्या पर्यटकांना कळावे याकरिता मेडिकल चौकात शिल्प उभारले जात आहे. या शिल्पातून मॉ-बापूंचा जीवनपट उलगडणार आहे.सेवाग्राम हे जगविख्यात पर्यटनस्थळ असल्याने येथे मोठ्याप्रमाणात पर्यटक येतात. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामे प्रगतीपथावर आहे.या विकास कामांमध्ये महात्मा गांधी आणि त्यांच्या संबंधित घडामोडीवरच लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे विकास कामे करताना बापूंच्या आठवणींना उजाळा देण्यासह ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील मेडिकल चौकातून तीन मार्ग जात असल्याने या महत्त्वाच्या चौकात सौदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.या चौकात एका बाजूने माँ कस्तुरबा यांच्या जीवनावर आधारीत एक नवे शिल्प साकारले जात असून त्यामध्ये वेगवेगळे प्रसंग साकारले आहे. यातून एक सामान्य स्त्री आपला परिवार ते देशाकरिता काय-काय करु शकतात. ही समर्पण भावना या शिल्पातून अनुभवता येणार आहे. या शिल्पातून न वाचणाऱ्यांना त्यांचे कार्य समजून येणार आहे. यामुळे सौदर्यीकरणात भर पडणार असून ऐतिहासिक ठेवाही जपल्या जाणार आहे.सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध चौकात साकारण्यात येणारे शिल्प मुंबईच्या जे. जे. स्कूल आॅफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. आता मेडिकल चौकातील कस्तुरबा गांधींचा शिल्प साकारला जात आहे. कस्तुरबा यांच्या जीवनातील विविध कथेवर आधारित हे शिल्प तयार होत आहे.- सुहास भिवनकर, विद्यार्थी, जे.जे.स्कलू आॅफ आर्ट.
कस्तुरबांवरील शिल्पातून उलगडणार जीवनपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 6:00 AM
या विकास कामांमध्ये महात्मा गांधी आणि त्यांच्या संबंधित घडामोडीवरच लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे विकास कामे करताना बापूंच्या आठवणींना उजाळा देण्यासह ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील मेडिकल चौकातून तीन मार्ग जात असल्याने या महत्त्वाच्या चौकात सौदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
ठळक मुद्देमेडिकल चौकाच्या सौंदर्यात भर : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत होतेय काम