लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वाधिक खपाचा दिवाळीअंक अशी ओळख असलेल्या लोकमतच्या दीपोत्सव जिल्ह्यात थाटात विमोचन करण्यात आले. मागील १५ वर्षांपासून मराठी दिवाळी अंकाच्या मालिकेत विविध उच्चांक गाठलेल्या या दिवाळी अंकाची सर्वत्र प्रतीक्षा असते. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खा. रामदास तडस यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे विमोचन देवळी येथे करण्यात आले. याप्रसंगी देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. गटनेत्या शोभा तडस, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, नगरसेविका कल्पना ढोक, लोकमतचे तालुका प्रतिनिधी हरिदास ढोक यांची उपस्थिती होती. दीपोत्सव हा लोकमतचा दर्जेदार दिवाळी अंक असून आपण गेल्या दहा वर्षांपासून याचे वाचक आहोत. लोकमतचा दीपोत्सव विविध विषयाचे ज्ञान देणाराच असून यंदाही वाचक या दिवाळी अंकाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करतील, असा विश्वास खा. तडस यांनी याप्रसंगी व्यक्त केला. हिंगणघाट येथेही दीपोत्सव दिवाळी अंकाचे विमोचन आ. समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समुद्रपूरचे नगराध्यक्ष गजानन राऊत व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आ. कुणावार यांनी अंकाची मांडणी, मजकुर व लोकमतच्या संपादकीय कामाची मुक्त कंठाने प्रशंशा केली. या अंकात कोरोनापासून ते चीन पर्यंतच्या विविध प्रश्नांना स्थान देऊन वाचकांचे ज्ञान समृद्ध करण्याचे काम लोकमतने केल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकमत दीपोत्सव ज्ञानात भर घालणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 5:00 AM
याप्रसंगी देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. गटनेत्या शोभा तडस, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, नगरसेविका कल्पना ढोक, लोकमतचे तालुका प्रतिनिधी हरिदास ढोक यांची उपस्थिती होती. दीपोत्सव हा लोकमतचा दर्जेदार दिवाळी अंक असून आपण गेल्या दहा वर्षांपासून याचे वाचक आहोत
ठळक मुद्देरामदास तडस : देवळी अन् हिंगणघाटात झाले थाटात विमोचन