पुरुषोत्तम नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ झाली. शिवाय या प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले. परिणामी, वर्धा नदी काठावरील शेतात पुराचे पाणी शिरले. या पुरपरिस्थितीचा एकूण ४५४ शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला असून ३५० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. तशी नोंद महसूल विभागाने घेतली असली तरी नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.वर्धा नदी काठावर शेत जमीन असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी कर्ज, उसनवारी तसेच घरच्या लक्ष्मीचे दागीने गहाण ठेऊन बियाण्यांसह खताची खरेदी केली. शिवाय मोठा धाडस करून सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची लागवड केली. वेळोवेळी पिकांची योग्य निगा राखल्याने पिकाची बऱ्यापैकी वाढ झाली. पण ऑगस्ट महिन्यांच्या शेवटी वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तसेच अपर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. अशातच निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडून वर्धा नदीत पाणी सोडण्यात आले. परिणामी, वर्धा नदी काठावरील गावांवर पुरपरिस्थिती ओढावली. शिवाय शेतांमध्ये पुराचे पाणी शिरले. २४ तासांपेक्षा जास्त वेळ उभे पीक पाण्याखाली राहिल्याने पिकांवरही विपरीत परिणाम झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास खाली पडला आहे. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी आणि नेमके किती नुकसान झाले याची माहिती गोळा व्हावी म्हणून महसूल विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या प्राथमिक अहवालात ४५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. एकूणच ३५० हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांनी वेळीच योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.पूरपीडित शेतकºयांकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्षफनिंद्र रघाटाटे ।रोहणा : आॅगस्ट महिन्यात वेळोवेळी झालेल्या पावसामुळे अपर वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले. याच पाण्यामुळे रोहणा, सायखेडा, दिघी, वडगांव, मारडा, सालफळ या गावातील नदी काठावरील शेतीला तलावाचे स्वरूप आले. शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला. अद्यापही नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळालेली नाही. पुरपीडित शेतकऱ्यांकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे काय, असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.वर्धा नदीवरील दोन्ही प्रकल्पातून पाणी सोडल्याने वर्धा नदीला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर आला. अशातच पुराचे पाणी नदी काठावरील शेतात शिरले. सुमारे ३० तास शेत शिवारातील पीक पाण्याखाली होती. यामुळे उभ्या पिकांवर परिणाम झाला. सदर परिस्थिती ओढावल्याने रोहणा, सायखेडा, दिघी, वडगांव, मारडा, सालफळ या गावातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उभ्या पिकाची परिस्थिती बघून उत्पादनही होणार नाही अशी स्थिती बघितल्यावर काही शेतकरी उभी पीक थेट उपटत आहेत. खरीपातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रबी हंगामाची तयारी शेतकरी करीत आहेत. पण हातात पैसाच नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ज्या वेळी शेताला तळ्याचे स्वरूप आले होते तेव्हा तालुका प्रशासनातील एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या शेताकडे फिरकला नाही. कार्यालयात बसून केवळ कागदी घोडे धावविण्यात आले. अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे पुरपीडितांकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळेल काय हे सध्या न उलगडणारे कोड ठरत असून शासकीय मदतीची अपेक्षा आहे.
निम्न वर्धाच्या पाण्याचा ४५४ शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 5:00 AM
ऑगस्ट महिन्यांच्या शेवटी वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तसेच अपर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. अशातच निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडून वर्धा नदीत पाणी सोडण्यात आले. परिणामी, वर्धा नदी काठावरील गावांवर पुरपरिस्थिती ओढावली. शिवाय शेतांमध्ये पुराचे पाणी शिरले. २४ तासांपेक्षा जास्त वेळ उभे पीक पाण्याखाली राहिल्याने पिकांवरही विपरीत परिणाम झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास खाली पडला आहे.
ठळक मुद्दे३५० हेक्टरवरील उभ्या पिकाची नासाडी । वेळीच नुकसान भरपाई देण्याची मागणी