महाबीज-९३०५ सोयाबीन उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:00 AM2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:00:35+5:30

केळझर येथील शेतकरी दमडू शिवराम थूल यांनी आनंद अ‍ॅग्रो एजन्सी या कृषी केंद्रातून महाबीजचे ९३०५ हे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. त्यानंतर या बियाण्यांची पेरणी त्यांनी शेतात केली. पण दहा दिवस लोटूनही बियाणे उगविले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दमडू यांनी बुधवारी सेलूच्या तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांना तसेच सेलू पं.स.च्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार सादर केली आहे.

Mahabeej-9305 Soybean has not grown at all | महाबीज-९३०५ सोयाबीन उगवलेच नाही

महाबीज-९३०५ सोयाबीन उगवलेच नाही

Next
ठळक मुद्देशेतकऱ्याला आर्थिक फटका : कृषी विभागाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : दहा दिवसांपूर्वी लागवड करण्यात आलेले महाबीज-९३०५ हे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सदर प्रकारामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून कृषी विभागाला त्याची तक्रार करण्यात आली आहे. बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याची आहे.
प्राप्त माहितीनुसार, केळझर येथील शेतकरी दमडू शिवराम थूल यांनी आनंद अ‍ॅग्रो एजन्सी या कृषी केंद्रातून महाबीजचे ९३०५ हे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. त्यानंतर या बियाण्यांची पेरणी त्यांनी शेतात केली. पण दहा दिवस लोटूनही बियाणे उगविले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दमडू यांनी बुधवारी सेलूच्या तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांना तसेच सेलू पं.स.च्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार सादर केली आहे. सदर प्रकारामुळे शेतकरी दमडू यांचे खरीपाच्या तोंडावर थेट १५ हजारांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Mahabeej-9305 Soybean has not grown at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.