बोंडअळीचे पंचनामे १० दिवसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 10:04 PM2017-12-10T22:04:09+5:302017-12-10T22:05:10+5:30

यंदाच्या खरीपात बी.टी. वाणावर बोंडअळीने आक्रमण केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Make 10 years of pondime in 10 days | बोंडअळीचे पंचनामे १० दिवसात करा

बोंडअळीचे पंचनामे १० दिवसात करा

Next
ठळक मुद्देमोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने होणार पडताळणी

आॅनलाईन लोकमत
आर्वी : यंदाच्या खरीपात बी.टी. वाणावर बोंडअळीने आक्रमण केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल व वनविभागाचे उपसचिव सु.ह. उमराणीकर यांनी आदेश काढून दहा दिवसात या बोंडअळीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
पंचनामे करण्याकरिता आवश्यक कालावधी कमी असल्याने फोटो जीपीएस मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने काढण्याचे आदेशात नमूद केले आहे. या पद्धतीने पंचनामे होणार असल्याने यात किती नुकसानग्रस्त शेतकरी पात्र ठरतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याचा थेट परिणाम कपाशी उत्पादनावर झाला. यात झालेल्या नुकसानीची पडताळणी मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्यात येणार असल्याने या संबंधीत विभागाच्या कर्मचाºयांना हा अ‍ॅप आधी त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करावा लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद होणार आहे.
यातही महसूल विभागाच्या सातबारात संबंधीत शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाची नोंद सातबारात असणे गरजेचे असल्याचे आदेशात नमूद आहे. यात सातबारे ‘अपडेट’ नसतील तर त्या शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळणार अथवा नाही असा प्रश्न आहे. पंचनाम्यात नुकसानीची टक्केवारी ३३ च्यावर असने आवश्यक आहे. यात आर्वी उपविभागात तीनही तालुके ३३ टक्क्यांच्या वर असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीवर नांगर फिरविल्याने त्यांचा सर्व्हे होणार कसा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेकांनी फिरविले नांगर
बोंडअळीच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या अनेक शेतकºयांनी त्यांच्या शेतातील कपाशीवर नांगर चालविला आहे. यामुळे या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आल्यास त्यांना याचा फायदा होईल अथवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

Web Title: Make 10 years of pondime in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.