लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बसस्थानक परिसरात २०० मीटरपर्यंत खाजगी प्रवासी वाहनांसह ट्रॅव्हल्स व काळी-पिवळी वाहने उभी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गावर सदर नियमाला बगल देत काही व्यावसायिकांकडून खासगी ट्रॅव्हल्स व काळी-पिवळी वाहनं रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहनात प्रवाशांचा भरणा केल्या जात आहे. याचा परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसह रुग्णालयातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वाहतूक पोलिसांनी योग्य कारवाई करण्याची मागणी आहे.वर्धा बसस्थानकाच्या भागात शासकीय नियमाचे उल्लंघन करून प्रवाशांचा खासगी वाहनांमध्ये भरणा केला जात आहे. खासगी प्रवासी वाहनाचा क्लिनर थेट बसस्थानकात येत जोरजोराने आवाज करीत प्रवाशांना आपल्या वाहनात बसण्यासाठी आवाज देताना दिसते. हा प्रकार गत काही दिवसांपासून मनमर्जीने सुरू असून त्याकडे बसस्थानक व्यवस्थापकांचे दुर्लक्ष होत आहे. बस स्थानक ते डॉ. आंबेडकर चौक भागात खाजगी वाहनांना प्रतिबंध घालण्यात आले आहे. असे असतानाही ट्रॅव्हल्स व काळी-पिवळी वाहनं व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर, गोदामाजवळ व महात्मा गांधी विद्यालय, शासकीय ग्रंथालय आणि बसस्थानकापुढे उभी करून वाहनात प्रवाशांचा भरणा केला जात आहे. ट्रॅव्हल्स व्यवसायिकांनी त्यांना प्रवासी मिळावे म्हणून काही तरुण नेमले आहेत. वाहतुकीची होणारी कोंडी व संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा वाहतूक नियंत्रक शाखेच्या पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेवून वाहतूक नियमांना पाठ दाखविणाºया खासगी प्रवासी वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात प्रवासी वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:05 AM
बसस्थानक परिसरात २०० मीटरपर्यंत खाजगी प्रवासी वाहनांसह ट्रॅव्हल्स व काळी-पिवळी वाहने उभी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
ठळक मुद्देवाहतूक नियमांचे उल्लंघन : रुग्णांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास