नगरपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल; प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 05:00 AM2020-11-11T05:00:00+5:302020-11-11T05:00:14+5:30

अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढण्याची वेळ आली आहे. एकूच सध्या थंडी वाढत असतानाच राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

Nagar Panchayat election bell rings; Ward wise reservation announced | नगरपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल; प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

नगरपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल; प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

Next
ठळक मुद्देसेलू, समुद्रपूर, आष्टी, कारंजात निवडणूक : अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
जिल्ह्यातील सेलू, आष्टी, समुद्रपूर आणि कारंजा (घा.) या चार नगरपंचायतीच्या निवडणुका असल्याने मंगळवारी प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले. अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढण्याची वेळ आली आहे. एकूच सध्या थंडी वाढत असतानाच राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

अनेक ठिकाणी महिलांना मिळाली संधी
आष्टी :
येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीचे आरक्षण मंगळवारी काढण्यात आले. यात प्रभाग क्रमांक १ अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ३ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ४ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ५ सर्वसाधारण नामाप्र, प्रभाग क्रमांक ६ अनुसूचित जमाती महिला, प्रभाग क्रमांक ७ सर्वसाधारण नामाप्र, प्रभाग क्रमांक ८ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ नामाप्र महिला, प्रभाग क्रमांक १० व ११ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १२ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १३ नामाप्र महिला, प्रभाग क्रमांक १४ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १५ नामाप्र महिला, प्रभाग क्रमांक १६ व १७ सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाल्याचे सांगण्यात आले.

उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारंजात काढली सोडत
कारंजा (घा.) :
येथील नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी पार पडली. याप्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक तसेच मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. इच्छेप्रमाणे आरक्षण न निघाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तर नवीन उमेदवार त्या वॉर्डामध्ये कोण राहिल याचा शोध राजकीय पक्षाकडून घेतला जात आहे. वॉर्ड क्रमांक १ हा अनुसूचित जाती महिला राखीव असून वॉर्ड क्रमांक २, १०, ११, १५, १६, १७ सर्वसाधारण उमेदवारांसाठी निश्चित झाला आहे. तर सर्वसाधारण स्त्री उमेदवारांसाठी वॉर्ड क्रमांक ३, ६, ७, १२, १३ निश्चित झाला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता वॉर्ड क्रमांक ५ आणि १४ निश्चित झालेले आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवारांसाठी वॉर्ड क्रमांक ४, ८, ९ निश्चित झालेले आहे. अशाप्रकारे १७ वॉडची विभागणी झाल्याने भाजप व काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांची अपेक्षा बाळगून असलेले बरेच उमेदवार हिरमुस झाले आहेत. सोडत यश चरडे व सुमित चरडे या लहान मुलांनी चिठ्ठी काढून काढली.

कारंजा (घा.) : येथील नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी पार पडली. याप्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक तसेच मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. इच्छेप्रमाणे आरक्षण न निघाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तर नवीन उमेदवार त्या वॉर्डामध्ये कोण राहिल याचा शोध राजकीय पक्षाकडून घेतला जात आहे. वॉर्ड क्रमांक १ हा अनुसूचित जाती महिला राखीव असून वॉर्ड क्रमांक २, १०, ११, १५, १६, १७ सर्वसाधारण उमेदवारांसाठी निश्चित झाला आहे. तर सर्वसाधारण स्त्री उमेदवारांसाठी वॉर्ड क्रमांक ३, ६, ७, १२, १३ निश्चित झाला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता वॉर्ड क्रमांक ५ आणि १४ निश्चित झालेले आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवारांसाठी वॉर्ड क्रमांक ४, ८, ९ निश्चित झालेले आहे. अशाप्रकारे १७ वॉडची विभागणी झाल्याने भाजप व काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांची अपेक्षा बाळगून असलेले बरेच उमेदवार हिरमुस झाले आहेत. सोडत यश चरडे व सुमित चरडे या लहान मुलांनी चिठ्ठी काढून काढली.

घोराड : सेलू नगरपंचायतचे प्रभाग निहाय आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. यात अकरा विद्यमान नगरसेवकांना दुसरे प्रभाग शोधावे लागणार आहे. सतरा सदस्य असलेल्या नगरसेवक पदाचे प्रभाग आरक्षणात नगरपंचायतचे उपाध्यक्ष अनिल काटोले, नगरसेवक व जिल्हा शिवसेना प्रमुख अनिल देवतारे, माजी नगराध्यक्ष राजेश जयस्वाल व माजी उपाध्यक्ष चूडामन हांडे, गट नेते व नगरसेवक शैलेंद्र दप्तरी या नेत्यांचे प्रभाग महिला राखीव झाले आहेत. तर नगरसेवक सनी खोडे, हिम्मत शहा, मनोरमा पराते, प्रेमिला जगताप, वंदना कळसाईत, जोत्सना नंदेश्वर यांना आरक्षण सोडतीमुळे दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. तर नगराध्यक्ष शारदा माहूरे, नगरसेवक वैशाली पाटील, लक्ष्मी डोंगरे, शैला शबिर शहा, सावित्री उइके, कल्पना कारवटकर या नगरसेवकांना आपल्याच प्रभागमध्ये निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. आरक्षणाच्या सोडतीमुळे नगरसेवकांमध्ये कुठे खुशी तर कुठे गम अशी परिस्थिती आढळून येत आहे. आरक्षणाची सोडत उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार महेंद्र सोनवणे, प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रभाग क्रमांक १६ अनुसूचित जाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १३ अनुसूचित जमाती स्त्री राखीव, प्रभाग क्रमांक १६ अनुसूचित जमाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १,२,७ ना.मा.प्र. महिला राखीव, प्रभाग क्रमांक ११, १७ ना.मा.प्र. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३,५,८,१२ (खुला) सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक ४,६,९,१०,१४ खुला महिला राखीव असे आरक्षण निघाले.

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत
ल्ल लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : समुद्रपूर येथे आरक्षणाची सोडत उपजिल्हाधिकारी प्रविण नेहारे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी स्वालिना मालगावे यांची उपस्थिती होती. वॉर्ड क्रमांक १ अनुसूचित जाती महिला, वॉर्ड क्रमांक २ अनुसूचित जमाती महिला, वॉर्ड क्रमांक ३ नामाप्र सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक ४ सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक ५ नामाप्र सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक ६ अनुसूचित जाती, वॉर्ड क्रमांक ७ नामाप्र महिला, वॉर्ड क्रमांक ८ सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक ९ नामाप्र महिला, वॉर्ड क्रमांक १० नामाप्र महिला, वॉर्ड क्रमांक ११ सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक १२ सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक १३ सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक १४ अनुसूचित जमाती, वॉर्ड क्रमांक १५ सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक १६ अनुसूचित जमाती आणि वॉर्ड क्रमांक १७ अनुसूचित जाती महिला असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. सोडत काढतेवेळी नगराध्यक्ष गजानन राऊत, विरोधी पक्षनेते मधुकर कामडी, नगरसेवक आशीष अंड्रस्कर, प्रा. मेघश्याम ठाकरे आदींची उपस्थिती होती. समुद्रपूर नगरपंचायतीवर सध्यास्थितीत भाजपची सत्ता आहे, हे विशेष.

Web Title: Nagar Panchayat election bell rings; Ward wise reservation announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.