लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या नगर नियोजन पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वर्धा जिल्ह्याची निवड करून आठही तालुक्यातील गावातील नागरिक, तलाठी, तहसील, वीज, बस, रेल्वे, पाणी पुरवठा, शेती, पर्यटन, पशुसंवर्धन, धरणे, कृषी, आपतकालीन, अधिकोष, डाक व तार आदी विभागाच्या विकासात्मक कार्यपद्धतीच्या कामाचा आढावा घेवून त्यात काय सुधारणा करता येईल यावर संशोधन केले आहे.वर्धा जिल्ह्याच्या आठ तालुक्याचा अभ्यास व विकासात्मक नियोजनचा सर्वे करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी व वरिष्ठ विभागांना सादर करणार असल्याची माहिती प्रा. डॉ. संजीवकुमार सोनार व प्रा. डॉ. आरती पेटकर यांनी दिली आहे. प्रादेशिक योजनांचे नियोजन करण्यासाठी आणि सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. वर्धा जिल्हा ही महात्मा गांधीजी व संत विनोबांजीेंची प्रयोग व कर्मभूमी राहिली आहे. अशा ऐतिहासिक जिल्ह्याची नगर विकासाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. गांधीजींच्या विचारावरील गोपुरी, महात्मा गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र आदी संस्थानाना भेटी देवून त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली आहे. ग्रामीण भाग सर्व दृष्टीने चांगला असून विकासासाठी संधी आहे. सर्व प्रकारची नैसर्गिक साधन संपदा असून दिशा व मार्गदर्शनाची गरज आहे. यावर विद्यार्थी अहवाल तयार करून तो सादर करणार आहे. १६ तारखेपर्यंत अभ्यासाचे कार्य चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांशी सेवाग्राम आश्रमात संवाद साधून विकासात्मक कार्याचे नियोजन करण्याची संधी मिळाली. चांगला अभ्यास करून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सर्वे पूर्ण करावा. वर्धा जिल्ह्याची निवड करून आम्हाला चांगल्या नियोजनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सदर प्राध्यापक विद्यार्थ्यांची व्यवस्था सेवाग्राम आश्रमच्या यात्री निवासात करण्यात आली असून मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांचे सहकार्य विद्यार्थ्यांना लाभत असल्याचे डॉ. संजीवकुमार सोनार यांनी सांगितले आहे.पुणे ते वर्धा असा प्रवास केला. वर्धा जिल्ह्या शांतीप्रिय जिल्हा आहे. येथील नागरिक जिल्ह्याबाहेरून आलेल्यांना चांगला प्रतिसाद व सहकार्य करतात. नागरिक व अधिकाºयांकडून अधिकची माहिती मिळाली. ग्रामीण क्षेत्राच्या विकासाचे नियोजन होणे गरजचे असून त्यावरच आमचा अधिक भर राहणार आहे. तळापासून शिखरापर्यंतच्या समान विकासाच्या सुत्राचा आम्ही विचार केल्याचे विद्यार्थी सांगतात.
विद्यार्थ्यांकडून नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:29 AM
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या नगर नियोजन पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वर्धा जिल्ह्याची निवड करून आठही तालुक्यातील गावातील नागरिक,....
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करणार : शैलेश नवाल यांनी साधला संवाद