काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत असहकार आंदोलन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:09+5:30

समाजवादी पार्टीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता महाराष्ट्रभर रॅली काढली आहे. या रॅलीची सुरुवात नागपुरातून झाली असून रविवारी दुपारी ही रॅली वर्ध्यात पोहोचली. यादरम्यान त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर चांगलीच तोफ डागली. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात विविध थोर महात्म्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले.

Non-cooperation movement will be set up from Kashmir to Kanyakumari | काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत असहकार आंदोलन उभारणार

काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत असहकार आंदोलन उभारणार

Next
ठळक मुद्देअबू आझमी : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात केंद्र सरकावर डागली तोफ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाचे पंतप्रधान नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून जातिवाद पसरविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे कश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत अशांतता माजली आहे. या कायद्याला समाजवादी पार्टीचा विरोध असून वारंवार हा कायदा रद्द करण्याची मागणी करीत आहोत. हा कायदा रद्द झाला नाही तर इंग्रजांप्रमाणेच केंद्रसरकारच्या विरुद्ध असहकार आंदोलन उभारले जाईल, असा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
समाजवादी पार्टीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता महाराष्ट्रभर रॅली काढली आहे. या रॅलीची सुरुवात नागपुरातून झाली असून रविवारी दुपारी ही रॅली वर्ध्यात पोहोचली. यादरम्यान त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर चांगलीच तोफ डागली. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात विविध थोर महात्म्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा गांधीजींचे नेतृत्व मान्य करणारे भारतात तर मोहम्मद जिना यांचे नेतृत्व स्वीकारणारे पाकिस्तानमध्ये गेले. जे भारतात आहे त्यांच्याकडे आधारकार्ड व मतदान कार्ड असतानाही त्यांचे नागरिकत्व नाकारण्याचा खटाटोप चालविला आहे. ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न न करता इंग्रजांचे तळवे चाटले तेच आता गांधीचीच्या स्वप्नाला मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घाणाघाती आरोपही आमदार अबू आझमी यांनी केला. सोबतच हिंदू-मुस्लिमध्ये वाद निर्माण करुन आरक्षण संपविण्याचा हा घाट असल्याने संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी केले. पत्रपरिषदेला सपचे प्रदेश सचिव इजहार अली, कामठीच्या माजी नगराध्यक्ष माया चवरे, जिल्हाध्यक्ष आसिफ शेख, परवेज सिद्दीकी व मुस्ताक खान आदींची उपस्थिती होती.

व्यापारी राजा बनू शकत नाही
देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून जेडीपीही कमी होत आहे.बांगलादेशापेक्षाही भारताची आर्थिक बाजू कमकुवत झाली. मात्र याकडे लक्ष न देता जातीच्या नावावर भडकविण्याचे काम सुरु आहे. व्यापारी कधीही राजा होऊ शकत नाही. त्यामुळे देशाचे संविधान वाचविण्यासाठी व्यापाऱ्यांना हकलून लावा, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचे मानले आभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्यवेळी देवेंद्र फडणवीस यांचा साथ सोडला. अन्यथा महाराष्ट्रातही युपीसारखी परिस्थिती असती. उत्तरप्रदेशात पोलिसांकडून गुंडागर्दी चालविली जात असून योगी सरकार चुकीच्या पद्धतीने आंदोलनातील नुकसान भरपाई वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. युपीमध्ये पोलीस व शासकीय कर्मचारी भाजपा व आरएसएसचे कामगार झाले आहे. जर महाराष्ट्रातही भाजप सरकार असते तर परिस्थिती युपीसारखी झाली असती, असेही आ. अबू आझमी यावेळी म्हणाले.
 

Web Title: Non-cooperation movement will be set up from Kashmir to Kanyakumari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.