जीव धोक्यात घालत शेतकऱ्यांची वहिवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 09:48 PM2020-03-05T21:48:51+5:302020-03-05T21:49:20+5:30
वर्धा-हिंगणघाट मार्गाचे त्रिनेवा कंत्राटदार कंपनीमार्फत रुंदीकरण केले जात आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, विकासाचा समतोल साधताना शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेण्यात आल्या नाही. वर्धा-हिंगणघाट मार्गालगत शेकडोवर शेतकऱ्यांच्या शेती असून या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. सद्यस्थितीत शेतात गहू, हरभरा आदी रब्बी पिके आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्ता नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. समन्वय आणि नियोजनाच्या अभावामुळे ही विकासकामे शेतकरी आणि नागरिकांकरिता डोकेदुखी ठरू लागली आहेत. अनेकांची रस्ता कामामुळे वहिवाट धोक्याची झाली असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
वर्धा-हिंगणघाट मार्गाचे त्रिनेवा कंत्राटदार कंपनीमार्फत रुंदीकरण केले जात आहे. रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, विकासाचा समतोल साधताना शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेण्यात आल्या नाही. वर्धा-हिंगणघाट मार्गालगत शेकडोवर शेतकऱ्यांच्या शेती असून या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. सद्यस्थितीत शेतात गहू, हरभरा आदी रब्बी पिके आहेत. पीक काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, नव्याने झालेल्या रस्ता बांधकामाने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे. रस्त्याचे बांधकाम करताना कुणाची वहिवाट ठप्प होऊ नये, याचे भान कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाने ठेवले नाही. यामुळे रस्ता अतिशय उंच तर शेतशिवार खाली गेले आहे. परिणामी शेतकऱ्यांना घसरगुंडीप्रमाणे तयार झालेल्या ढिगावरून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. जिवावर उदार होत बैलबंडीनेही शेतीसाहित्याची वाहतूक करावी लागत आहे. यापूर्वी अनेक शेतकºयांना बैलबंडी घसरून अपघात झाला. कित्येकांना कायमचे अपंगत्व आले. मात्र, कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. शेतात जाण्यास रस्ता नसल्याने अनेकांवर कापणीला आलेली पिके शेतातच ठेवण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, शेतात जाण्याकरिता रस्त्याचे कंत्राटदाराने बांधकाम करून दिले नाही. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयांची महामार्ग प्राधिकरणाकडून थट्टा केली जात आहे. शेतात जाण्याकरिता रस्त्याचे बांधकाम करून देण्यात यावे, अशी मागणी सुनील हिवंज, देवराव हिवंज, प्रवीण जाधव, भरणे, काशीकर, वाणी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी शेतातच ठेवला शेतमाल
रस्त्याचे बांधकाम करताना शेतकऱ्यांचे मत ग्राह्य धरण्यात आले नाही. रस्ता बांधकाम पूर्णत्वास गेले. मात्र, रस्ता उंच आणि शेती खाली अशी आज परिस्थिती आहे. यात वाहतुकीस अडचण निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि चण्याची पोती शेतातच ठेवली आहेत. अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा स्थितीत शेतमाल शेतातच भिजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सध्या पीक काढणीचा हंगाम आहे. रस्ता बांधकामात वहिवाट अडचणीत आली आहे. मजुरांचा आधीच तुटवडा आहे. मजूर मिळत असताना वहिवाटीयोग्य रस्ता नसल्याने मजूर शेतात येण्यास नकार देत असून पीक काढणीत खोडा निर्माण झाला आहे.
सुनील हिवंज, शेतकरी, सेलूकाटे