सोशल मीडियावर अधिकारी, राजकीय व्यक्तींना हॅकर्सकडून केले जातेय लक्ष्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 05:00 AM2021-10-13T05:00:00+5:302021-10-13T05:00:47+5:30
प्रोफाईलवर गेल्यानंतर वर उजव्या बाजूने तीन डॉट (...) दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा, तुमच्या समोर ‘फाईंड सपोर्ट ऑर रिपोर्ट प्रोफाईल’ हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा, ‘प्रेटेन्डिंग टू बी समवन’ हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तीन ऑप्शन दिसतील त्यामध्ये ‘मी, अ फ्रेंड आणि सेलिब्रिटी’ आणि आपलीच बनवलेली फेक प्राेफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी ‘मी’ हा ऑप्शन सिलेक्ट करावा आणि नेक्स्ट करावे. फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातच वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, राजकीय व्यक्ती, नेते, सामाजिकदृष्ट्या मोठी नावं असलेल्या व्यक्तींची सोशल मीडियावरील प्रोफाईल हॅक करण्यात येत आहे.
प्रोफाईल हॅक केल्यानंतर सायबर हल्लेखोरांकडून त्या व्यक्तींच्या मित्रांना पैसे मागणीचे मेसेज करून त्यांच्याकडून रक्कम उकळली जात आहे. मात्र, आपले प्रोफाईल सुरक्षित कसे ठेवावे, प्रोफाईल हॅक झाल्यास काय करावे, यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्याचे सायबर तज्ज्ञ सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांच्याकडून ‘लोकमत’ने नागरिकांनी नेमके यावर काय करावे, याबाबतची माहिती जाणून घेतली आहे. ज्यांचे प्रोफाईल फेक बनविण्यात आले आहे त्यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुक अकाउंटवरून बनवलेली फेक प्रोफाईल शोधा, स्वत:ला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट आली असेल त्यांच्याकडून सदर फेक प्रोफाईलची लिंक मागवून घ्या.
त्या प्रोफाईलवर गेल्यानंतर वर उजव्या बाजूने तीन डॉट (...) दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा, तुमच्या समोर ‘फाईंड सपोर्ट ऑर रिपोर्ट प्रोफाईल’ हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा, ‘प्रेटेन्डिंग टू बी समवन’ हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तीन ऑप्शन दिसतील त्यामध्ये ‘मी, अ फ्रेंड आणि सेलिब्रिटी’ आणि आपलीच बनवलेली फेक प्राेफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी ‘मी’ हा ऑप्शन सिलेक्ट करावा आणि नेक्स्ट करावे. फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
फेसबुक प्राेफाईल सुरक्षित कसे करावे, काही सावधगिरीच्या टिप्स
स्वत:ची फेसबुक फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तींना दिसू नये म्हणून सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी सेटिंग नंतर ‘व्हू कॅन सी युअर फ्रेंडलिस्ट’ त्या ठिकाणी गेल्यावर ‘ओन्ली मी’ ऑप्शन सिलेक्ट करावे.
स्वत:चे प्राेफाईल फोटो, कव्हरपेज, अनोळखी व्यक्तींद्वारे कॉपी किंवा डाऊनलोड करु नये, म्हणून सेटिंग त्यानंतर प्राेफाइल लॉकिंग त्याठिकाणी गेल्यानंतर ‘लॉक युअर प्राेफाईल’ करावे.
अनोळखी व्यक्तीने आपल्याला ‘फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू’ नये, म्हणून सेटिंग नंतर प्रायव्हसी सेटिंग त्यानंतर ‘व्हू कॅन सेंड फ्रेंड रिक्वेस्ट’ त्याठिकाणी फ्रेन्डस् ऑफ फ्रेन्ड्स करावे. स्वत:चे अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी ‘सिक्युरिटी ॲन्ड लॉगिन’ त्यानंतर ‘टू फॅक्टर ऑर्थेटीकेशन’ करावे.
स्वत:चा फेसबुक प्रोफाईलवरील ‘ईमेल आयडी’ इतरांना दिसू नये यासाठी प्रायव्हसी सेटिंग त्यानंतर ‘व्हू कॅन लुक यू अप युझिंग दर ईमेल ॲड्स यू प्राेव्हाइडेड’ त्याठिकाणी ‘ओन्ली मी’ करावे. प्रोफाईलवरील मोबाईल क्रमांक दिसू नये यासाठी प्रायव्हसी सेटिंग त्यानंतर ‘व्हू कॅन लुक यू अप युझिंग द फोन नंबर यू प्राेव्हायडेड’ त्याठिकाणी ‘ओन्ली मी’ करावे.