अधिकारी, कर्मचाऱ्यांपूर्वी पोहोचले ‘लोकमत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:00 AM2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:48+5:30

९.४५ वाजता सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी कार्यालयात येणे अपेक्षीत होते. मात्र, अपवाद वगळता एकाही कार्यालयात या वेळेत अधिकारी व कर्मचारी पोहोचले नाही. त्यांच्यापूर्वी लोकमतचे प्रतिनिधी कार्यालयात पोहोचल्याचे दिसून येताच अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच धावपळ उडाली. काहींनी लगबगीने थम्ब करायची तर काहींनी स्वाक्षरी मारण्याची घिसाडघाई केली.

Officials reach 'Lokmat' before employees | अधिकारी, कर्मचाऱ्यांपूर्वी पोहोचले ‘लोकमत’

अधिकारी, कर्मचाऱ्यांपूर्वी पोहोचले ‘लोकमत’

Next
ठळक मुद्देनऊ वाजतापासून तासभर उपस्थिती : कुठे कार्यालये कुलूपबंद तर कुठे अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिसली धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पाच दिवसांच्या आठवड्यातील कामकाजाचा आजचा पहिला दिवस. नवीन वेळेनुसार शासकीय कार्यालय उघडण्याची वेळ सकाळी ९.३० वाजताची होती. त्यामुळे सातही तालुक्यात निवडलेल्या शासकीय कार्यालयापुढे लोकमतचे प्रतिनिधी सकाळी ९ वाजतापासूनच उपस्थित होते.
कार्यालयातील शिपायांनी नवीन वेळेनुसार ९.३० वाजता कार्यालय उघडून आपले दैनंदिन काम सुरू केले. त्यानंतर ९.४५ वाजता सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी कार्यालयात येणे अपेक्षीत होते. मात्र, अपवाद वगळता एकाही कार्यालयात या वेळेत अधिकारी व कर्मचारी पोहोचले नाही. त्यांच्यापूर्वी लोकमतचे प्रतिनिधी कार्यालयात पोहोचल्याचे दिसून येताच अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच धावपळ उडाली. काहींनी लगबगीने थम्ब करायची तर काहींनी स्वाक्षरी मारण्याची घिसाडघाई केली.
अशातच हजेरी पटावर स्वाक्षरी करताना रविवार आहे की सोमवार, याचेही भान न ठेवता रविवारच्या रकाण्यातच स्वाक्षरी केल्याचाही प्रकार घडला. काहींनी आपल्या सहकार्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कार्यालयात लवकर येण्यास सांगितले, तर काही काहींनी निगरगट्टपणाचे पांघरुण घेतल्याचेही दिसून आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय
च्आर्वी मार्गावरील कारला चौकात असलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पाच दिवसांच्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी कर्मचाºयांचा चांगलाच गोंधळ उडाला. बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थित झाले तर अनेकांना नव्या वेळेचा विसर पडल्याचे दिसून आले. कामकाजाचे दिवस कमी केल्याने कामाच्या वेळेत ४५ मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वेळेनुसार सकाळी ९.४५ वाजतापर्यंत कर्मचाºयांना कार्यालयात हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता शिपायी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय उघडत होता. त्यानंतर कर्तव्याप्रमी प्रामाणिक असलेले कर्मचारी ९.४५ वाजतापर्यंत कार्यालयात उपस्थित झाले. तर बहुतांश कर्मचाºयांना या बदललेल्या वेळेचा विसर पडल्याने ते वेळेवर पोहोचलेच नाही. या कार्यालयात ३० अधिकारी व कर्मचारी तर २४ कंत्राटी कर्मचारी असून एकूण ३४ कर्मचारी कार्यरत आहे. पहिल्या दिवशी हर्षल शेडमाके, घोसळकर, किरण चौधरी, प्रभाकर कुंभारे, अमोल चौधरी, देवेंद्र ठाकरे, स्वप्नील बाभुळकर, सूर्यकांत चौधरी, यशवंत मुरखे, नीतेश कोठेकर, किरण ढोक, अविनाश भागवत हे कर्मचारीच नियोजित वेळेत पोहोचले. उर्वरित अधिकारी व कर्मचारी वेळेनंतरही कार्यालयात आले नाही.

रविवारच्या तारखेत केली कर्मचाºयांनी स्वाक्षरी
च्सोमवारपासून शासकीय कार्यालयातील कामाकाजाची वेळ बदलविण्यात आल्याने कर्मचाºयांचा चांगलाच गोंधळ उडाला. आपला लेटमार्क लागू नये म्हणून अनेकांनी हजेरी बुकात स्वाक्षरी करण्याची घाई केली. त्यातही लोकमतचा वॉच असल्याने अनेकांना घाम फुटला होता. त्यामुळे बहूतांश कर्मचाºयांनी सोमवार ऐवजी रविवारच्या तारखेतच स्वाक्षरी केली. ही बाब कार्यालयातील अधिकारी घोसाळकर यांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा कर्मचाºयांना बोलावून सोमवारच्या तारखेत स्वाक्षरी करण्यास सांगितले.
 

Web Title: Officials reach 'Lokmat' before employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.