प्लॉस्टिक कचऱ्याचे जलस्त्रोतांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:34 PM2017-12-27T23:34:24+5:302017-12-27T23:35:09+5:30

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेऊन जगभरात वृक्षांचे रोपण करण्याची होडच लागली आहे; पण प्लास्टिक कचऱ्याचा धोका दुर्लक्षित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Plotch trash water resources crisis | प्लॉस्टिक कचऱ्याचे जलस्त्रोतांवर संकट

प्लॉस्टिक कचऱ्याचे जलस्त्रोतांवर संकट

Next
ठळक मुद्देनैसर्गिक झरे धोक्यात : जिल्हा प्रशासनासह सामाजिक संघटनाही उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेऊन जगभरात वृक्षांचे रोपण करण्याची होडच लागली आहे; पण प्लास्टिक कचऱ्याचा धोका दुर्लक्षित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. नदी, नाले, तलाव आदी जलस्त्रोतांवरच आता प्लास्टिक कचऱ्याचे संकट घोंगावू लागले आहे. परिणामी, जलस्त्रोत धोक्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत हे जलस्त्रोत वाचविणे तथा नागरिकांनी प्लास्टिक कचऱ्यावर आवर घालणे गरजेचे झाले आहे.
अनादी कालापासून शहरे, गावांचे मुख्य जलस्त्रोत ठरलेल्या नद्या सध्या संकटात सापडल्या आहेत. सर्व नद्यांना सध्या प्लास्टिकच्या कचºयापासून मोठा धोका निर्माण झाला आहे. देवळी तालुक्यातील कोटेश्वर हे देवस्थान सर्वपरिचित आहे. कोटेश्वर येथे वर्धा नदीचे मोठे पात्र आहे. या ठिकाणी ही नदी उत्तरवाहिणी होते. यामुळे कोटेश्वरचे महत्त्व मोठे आहे. यामुळे पितरांचे पूजन करण्याकरिता असंख्य नागरिक येथील नदी पात्राजवळ येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी येथे घाटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुरातन असलेल्या या घाटाचा आता विकासही होऊ घातला आहे; पण कोटेश्वर येथील पूजाच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंतिम संस्कारानंतर राखड शिरविणे, दसवा तथा अन्य विधी उरकण्यासाठी नागरिक कोटेश्वर घाटावर येतात. येताना अनेक साहित्य, प्लास्टिक पिशवी तथा अन्य प्लास्टिकच्या वस्तू घेऊन येत असतात. स्रान, पूजा विधी उरकल्यानंतर नागरिक प्लास्टिक पिशवी, प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण व अन्य वस्तू मात्र नदी पात्रातच टाकून देतात. परिणामी, नदीतील पाणी प्रदूषित होत असून पात्रामध्ये सर्वत्र प्लास्टिकचा कचरा पाहावयास मिळतो. कोटेश्वर येथील वर्धा नदी उत्तरवाहिनी असल्याने तेथील पात्रात पाणी थांबून राहते. यामुळे हा कचरा कुठेही वाहून न जाता तेथेच पात्रातील पाण्यावर तरंगताना दिसतो. शिवाय या कचºयामुळे पाणी दूषित होऊन दुर्गंधी पसरते. याच पाण्यात भाविकांना स्रान करावे लागते. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
प्लास्टिकच्या कचऱ्याचे निर्मूलन करण्याकरिता अनेकदा माजी पं.स. सभापती मनोज वसू यांच्या नेतृत्वात रोहणी, कोटेश्वर तथा परिसरातील युवकांनी स्वच्छता अभियान राबविले. शिवाय कोटेश्वर येथे येणाऱ्या नागरिकांत जनजागृती करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, परंपरांच्या नावाखाली नदी पात्र प्रदूषित करण्याचे काम थांबतच नसल्याचे दिसून येत आहे. सध्या कोटेश्वर येथील वर्धा नदीच्या पात्रामधील पाण्यावर शेवाळ तथा कचरा तरंगताना दिसून येतो. हा कचरा बाजूला सारून भाविकांना आंघोळ करावी लागते. कचऱ्यामुळे पात्र उथळ झाले आहे. शिवाय पोहण्याचा आनंदही हिरावला गेल्याचे दिसून येत आहे. भविष्यात पौराणिक महत्त्व असलेले कोटेश्वर येथील वर्धा नदीचे उत्तरवाहिनी पात्र नष्ट होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासन तथा सामाजिक संघटनांनी आणि नागरिरकांनी यासाठी पुढाकार घेत जलस्त्रोतांजवळील प्लास्टिक कचऱ्यावर आवर घालणे गरजेचे झाले आहे. शिवाय कोटेश्वर येथील उत्तरवाहिनीचे जतन करण्यासाठी स्वच्छता अभियान तथा जनजागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे झाले आहे. सदर उपक्रम लोकचळवळच होणे काळाची गरज आहे.
तेथेच जाळला जातो कचरा
राखड शिरविण्यासह दसवा व अन्य विधीसाठी येणारे नागरिक सोबत आणलेला कचरा पात्रालगतच पायऱ्यांजवळ जाळला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसराला घाणीचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे. पात्रालगतच्या कचऱ्यामुळे घाटावर दुर्गंधी पसरलेली आहे. नागरिकांनी हा कचरा बाहेर जाळल्यास नदी पात्र व परिसर स्वच्छ राहण्यास मदत होऊ शकेल.

Web Title: Plotch trash water resources crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.