लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला. यावरून मोठे वादंगही निर्माण झाले. मात्र, शनिवारी त्यांनी सेवाग्राम आश्रमच्या समिती सदस्यांना पत्र पाठवून आपण दिलेला राजीनामा परत घेत सन्मानाने पद सांभाळणार असल्याचे कळविले आहे.प्रभू यांनी पत्रात सर्व सेवा संघांच्या अध्यक्षांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप लावले होते. दरम्यान, आश्रमात काम करणे अडचणीचे ठरल्याने राजीनामा संचालक समितीच्या सदस्यांना पाठविला होता. यात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. यामुळे राजीनामा सदस्यांना पाठविला; पण यावर कुणीच काही प्रतिक्रिया,संमती दिलेली नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.या दरम्यान सर्व सेवा संघांच्या अध्यक्षांनी दूरध्वनीववर सौजन्यपूर्ण संभाषण केले. गांधी विचारांची व्यापकता आणि सेवाग्राम आश्रमाची प्रतिष्ठा लक्षात घेता राजीनामा परत घेत असल्याचे प्रभू यांनी पत्रात नमूद केले असून लॉकडाऊननंतर संचालक मंडळाची बैठक घेणार असल्याचे कळविले. प्रभू यांनी २२ मे रोजी राजीनामा दिला होता. शनिवारी १३ जूनला तब्बल २१ दिवसांनंतर प्रभू राजीनामा परत घेत कार्यालयात उपस्थित झाले आणि राजीनामा नाट्य संपुष्टात आले.देशभरातील गांधी विचारक आणि कार्यकर्त्यांची असलेली भावना, पदावर कायम राहा असा त्यांचा असलेला आग्रह याचा सन्मान ठेवत राजीनामा परत घेतला आहे.- टी.आर.एन.प्रभू , अध्यक्ष, आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभू यांचा राजीनामा मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 3:04 PM
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी २२ मे रोजी राजीनामा दिला होता. शनिवारी १३ जूनला तब्बल २१ दिवसांनंतर प्रभू राजीनामा परत घेत कार्यालयात उपस्थित झाले आणि राजीनामा नाट्य संपुष्टात आले.
ठळक मुद्देशनिवारी कार्यालयात झाले रुजूराजीनामा नाट्य संपुष्टात