यंदा तूर, कपाशी, सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:00 AM2020-09-23T05:00:00+5:302020-09-23T05:00:17+5:30

यंदाच्या वर्षी आठही तालुक्यांमध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले. यात २ लाख हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. तर ६५ हजार हेक्टरवर यंदा तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. वेळोवेळी झालेल्या पावसासह योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली.

The production of tur, cotton and soybean is likely to decline this year | यंदा तूर, कपाशी, सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता

यंदा तूर, कपाशी, सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देकृषितज्ज्ञांचे मत : सततच्या पावसाचा उभ्या पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस सुरू आहे. अशातच सोयाबीन पिकावर खोडमाशी, कपाशीवर गुलाबी बोंडअळी तर तूर पिकावर सध्या ढगाळी वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे. सततचा पाऊस पुढेही काही दिवस सुरू राहिल्यास तूर, कपाशी आणि सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
यंदाच्या वर्षी आठही तालुक्यांमध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले. यात २ लाख हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. तर ६५ हजार हेक्टरवर यंदा तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. वेळोवेळी झालेल्या पावसासह योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. पण सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात थांबून थांबून पाऊस होत असल्याने आणि ढगाळी वातावरण कायम असल्याने तूर, सोयाबीन आणि कपाशी पिकावर याचे दुष्परिणाम होत आहेत. सुरूवातीला पिकाची परिस्थिती बघता यंदा एकरी सरासरी आठ क्विंटल सोयाबीन होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण खोडमाशी व जिल्ह्यातील ढगाळी वातावरण तसेच सततच्या पावसामुळे यंदा एकरी पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.
जर सप्टेंबर महिन्यासह ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास किमान आणखी एक क्विंटलने उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

तूर पिकावर फुलगळतीचे सावट
सध्या तूर पिकाची बºयापैकी वाढ झाली असली तरी येत्या काही दिवसानंतर हे पीक फुलावर येणार आहे. याच दरम्यान सतत पाऊस सुरू राहून ढगाळी वातावरण कायम राहिल्यास या पिकावरील फुलांची गळती होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात फुलगळती झाल्यास उत्पादनातही मोठी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कपाशीवर बोंडअळीची वक्रदृष्टी
सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या काही कृषी तज्ज्ञांनी सुमारे दहा ते बारा गावात प्रत्यक्ष जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली असता त्यांना कपाशी पिकावर नुकसानीच्या पातळीपर्यंतचे गुलाबी बोंडअळीचे पतंग आढळून आले आहेत. त्यामुळे यंदा कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीची वक्रदृष्टीच असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: The production of tur, cotton and soybean is likely to decline this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती