व्यसनमुक्ती सप्ताहात विविध कार्यक्रमांतून जनजागृती
By admin | Published: October 10, 2015 02:44 AM2015-10-10T02:44:48+5:302015-10-10T02:44:48+5:30
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग व राज्याच्या नशाबंदी...
महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह : रॅली, चर्चासत्र, मेळावे आदी भरगच्च कार्यक्रम सादर
वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग व राज्याच्या नशाबंदी मंडळातर्फे जिल्ह्यात महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह दि. २ ते ८ आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम, मेळाव्यांनी साजरा करण्यात आला. सप्ताहाला विविध महाविद्यालयाचे व शालेय विद्यार्थी व शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती. विशेषज्ज्ञांनी सप्ताहात व्यसनमुक्ती बाबत व्यापक चर्चा व जनजागृती करण्यात आली.
यावेळी आयोजित महिला मेळाव्यात कृषी सभापती श्यामलता अग्रवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, पोलीस उपअधीक्षक किल्लेकर, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, तुकाराम घोडे महाराज, पुजा जाधव, म्हस्के, नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर येवतकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तुकाराम घोडे महाराज नांदेड जिल्ह्याचे म्हस्के उपस्थित होते. संचालन प्रज्ञा ब्राह्मणकर व आभार रामटेके यांनी मानले. सत्पाहात आर्वी नाका येथील वडार वस्ती मंदिराजवळ कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, तुकाराम घोडे, नशाबंदी मंडळाचे वर्धा अध्यक्ष ज्ञानेश्वर येतवकर, विशाल बुरांडे, नितेश काळे, कुंभलकर समाज कार्य महाविद्यालय येथील प्राध्यापक राम खंडकर, वडार समाजाचे अध्यक्ष गजानन उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दीपाल गोरडे यांनी केले. आभा पुनम आसेगावकर यांनी मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला महेश पवार, पंकज वंजारे, डॉ. राम, अमोल मानकर, नितेश कराळे आणि ठाणेगाव येथील सुरेश मलवे उपस्थित होते. चर्चासत्रात
समाज कल्याण विभागाच्या विशेष अधिकारी दीपा हेरोळे, प्रमुख पाहुणे सर्पमित्र व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गजेंद्र सुरकार, नशाबंदी मंडळाचे ज्ञानेश्वर येवतकर, सर्वोदय युवावाहिनीचे अविनाश, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके उपस्थित होते. संचालन दीपाली गोरडे यांनी केले. आभार समाज कल्याण निरीक्षक सुदेश कोंडे यांनी मानले. युवकांसाठी व्यसनमुक्ती सप्ताहात युवा कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडली. संचालन पूजा पवार तर आभार वीरेंद्र जळके यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)