दीड महिन्यात २,३८१ नवीन वाहनांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 05:00 AM2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:01:00+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांच्या दैनंदिन कामाला गती देण्यास सुरूवात करण्यात आली. वरिष्ठांच्या सूचनांवरून १ जूनपासून नवीन वाहनांची नोंदणी करण्याची प्रक्रिया वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सुरू करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दैनंदिन कामाला गती दिली जात आहे. १ जून ते २६ जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत या विभागाकडे एकूण २ हजार ३८१ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यात २ हजार २२७ दुचाकी, १५२ चारचाकी तर दोन प्रवासी वाहनांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांच्या दैनंदिन कामाला गती देण्यास सुरूवात करण्यात आली. वरिष्ठांच्या सूचनांवरून १ जूनपासून नवीन वाहनांची नोंदणी करण्याची प्रक्रिया वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सुरू करण्यात आली. १ जून ते २६ जुलै या कालावधीत या विभागाने एकूण २,३८१ वाहनांची नोंदणी केली आहे. या कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन अधिकाऱ्यांसह कर्मचारी, कामानिमित्त येणाºया नागरिकांकडून केले जात आहे.
५.६१ कोटींचा महसूल कमविला
वाहन नोंदणी शुल्कासह विविध शुल्काच्या माध्यमातून वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाने ५ कोटी ६१ लाख ७१ हजारांचा महसूलाची कमाई केली आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत भर पडली आहे.
२,४५१ व्यक्तींना दिला वाहन चालविण्याचा परवाना
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वाहन चालविण्याचा पक्का व तात्पूरता परवाना देण्याची प्रक्रिया उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून १६ जून पासून सुरू करण्यात आली. १६ जून ते २६ जुलै या एक महिना दहा दिवसांच्या काळात उपप्रादेशिक परिवहन विभागाने १ हजार ५६० व्यक्तींना वाहन चालविण्याचे लर्निंग लायसन तर ८९९ व्यक्तींना परमनंट लायसन दिले आहेत.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर दैनंदिन कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ४५९ व्यक्तींना वाहनचालविण्याचा परवाना देण्यात आला आहे. तर २ हजार ३८१ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.
- विजय तिराणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन, अधिकारी, वर्धा.