सेवाग्रामात राबविले स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:00 AM2020-10-01T05:00:00+5:302020-10-01T05:00:07+5:30
गांधीजींच्या १५१ व्या जयंती निमित्ताने आश्रमात अखंड सूतकताईने राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यात येणार आहे.सकाळी ५.४५ वा.नयी तालिम समिती परिसरातील घंटी घरापासून रामधून गात प्रभातफेरी काढण्यात येईल.आदी निवासला वळसा घालून बापू कुटी परिसरात प्रार्थना होईल आणि ६.०० वा बापू कुटीतील वरांड्यात अखंड सूतकताईला सुरूवात होईल. सामुहिक श्रमदानानंतर ९.०० वा जालंधरनाथ व विद्यार्थी वैष्णव जन तो हे भजन गातील.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : ग्रामपंचायतीच्यावतीने बुधवारला जुन्या वस्तीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
महात्मा गांधीजींची १५१ वी जयंती देशच नव्हे तर जगात साजरी होणार आहे. गांधीजींनी सेवाग्राम येथे स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले होते. गांधीजींच्या जयंती पर्वावर गुरूवाडी ते चौकापर्यंत मुख्य मार्गाची साफसफाई करण्यात आली. रस्त्यावरील केरकचरा काढून खराटा मारण्यात आला. यावेळी सरपंच सुजाता ताकसांडे, पंचायत समिती सदस्या भारती उगले, उपसरपंच सुनील पनत, सदस्य मुन्ना शेख, मुरलीधर कुमरे, भारती कडू, प्रिया कांबळे, अंगणवाडी सेविका निर्मला देवतळे, सरला हटवार, सुरेखा वांढरे, मदतनीस रेखा उगले, आशा वर्कर रंजना भोयर, नलिनी ओंकार, अशोक उगले, सतीश बावणे , विजय आळणकर, पुंडलिक मोहनकर, अशोक राऊत, निर कोल्हे,सौरभ ताकसांडे आदीसह नागरिक सहभागी झाले होते.
अखंड सूतकताईने वाहणार आदरांजली
गांधीजींच्या १५१ व्या जयंती निमित्ताने आश्रमात अखंड सूतकताईने राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यात येणार आहे.सकाळी ५.४५ वा.नयी तालिम समिती परिसरातील घंटी घरापासून रामधून गात प्रभातफेरी काढण्यात येईल.आदी निवासला वळसा घालून बापू कुटी परिसरात प्रार्थना होईल आणि ६.०० वा बापू कुटीतील वरांड्यात अखंड सूतकताईला सुरूवात होईल. सामुहिक श्रमदानानंतर ९.०० वा जालंधरनाथ व विद्यार्थी वैष्णव जन तो हे भजन गातील.औपचारीक स्वागत व प्रास्ताविक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी .आर.एन .प्रभू करतील.९.३५ वा.अविनाश काकडे महात्मा गांधीजींनी पहिले भाषण बनारस हिंदी विद्यापीठात व सेवाग्राम येथील केलेल्या भाषणाच्या प्रती बाबत प्रास्ताविक व विमोचन करतील. परिसरातच जालधंरनाथ आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली सत्य, अहिंसा,शांती, जय जगत प्रदर्शन लावण्यात येणार आहेत. सायंकाळी ५.३० वा.प्रार्थना भूमिवर सामुहिक सूतकताई होऊन दैनिक प्रार्थना सायंकाळी होणार आहे.
लॉकडाऊनमुळे आश्रम पर्यटकांसाठी अजूनही बंदच
सेवाग्राम : गांधीजींची जयंती या वर्षी कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही.मार्च महिन्यापासून बापूकुटी पर्यटन स्थळ बंद करण्यात आले आहे.यात आश्रमही बंद ठेवण्यात आले आहे.आश्रमातील दुकाने पण बंद ठेवण्यात आली आहे. पण गांधी जयंतीला सुरू करण्यात येत असल्याने स्वच्छता आणि तेलपाणी देण्याचे कामही सुरू आहे. आश्रम पर्यटकांसाठी बंद केले असले तरी दैनंदिन व्यवहार मात्र नेहमीप्रमाणे सुरूच आहेत.
आश्रमातील विविध प्रजातींची झाडे बापूंच्या पर्यावरण प्रेमींनी साक्ष दर्शविते.प्रसंगाला झाडे लावण्याचा प्रघात त्या काळात होता १९३६ चे पिंपळ झाड,बा ने लावलेले बकुळ,विनोबांनी भूदान चळवळ प्रसंगी लावलेले पिंपळ झाड. झाडे आश्रमातील वैशिष्टये असून झाडे वाचवा संवर्धन करा असा संदेश यातून दिलेल्या जात आहे. आश्रमात पर्यटकांना बंदी असली तरी नतमस्तक होण्यासाठी गांधीप्रेमी येणार यात शंका नाही.आश्रम बापूंच्या जयंती साठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.