कॅनच्या पाण्यावर भागतेय तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:33 PM2018-02-11T22:33:38+5:302018-02-11T22:33:59+5:30

शहरी भागात पाणी पुरवठ्याची पुरेपूर व्यवस्था असताना दयालनगर येथील नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. त्यांना तहान भागविण्याकरिता पाण्याच्या कॅन विकत आणून आपली तहान भागवावी लागत आहे.

Scorching thighs on cane water | कॅनच्या पाण्यावर भागतेय तहान

कॅनच्या पाण्यावर भागतेय तहान

Next
ठळक मुद्दे दयाल नगरातील प्रकार : नळाला दूषित पाणी

ऑनलाईन लोकमत
वर्धा : शहरी भागात पाणी पुरवठ्याची पुरेपूर व्यवस्था असताना दयालनगर येथील नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. त्यांना तहान भागविण्याकरिता पाण्याच्या कॅन विकत आणून आपली तहान भागवावी लागत आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वर्धा शहरातील या भागात असलेल्या नळाला गढूळ पाणी येत आहे. शिवाय या पाण्याला दुर्गंधी येत आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील चिमुकल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती या भागातील नागरिकांनी दिली. या प्रकाराची माहिती प्रहारच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास पालिका कार्यालयावर येत आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
या भागात हा प्रकार गत २० दिवसांपासून सुरू आहे. याची तक्रार नागरिकांनी प्रभागाच्या नगरसेवकाकडे केल्याची माहिती प्रहाराच्या कार्यकर्त्यांनी दिली. असे असताना त्यांच्याकडून ही समस्या मार्गी काढण्यासंदर्भात कुल्याही उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत. परिणामी नागरिकांना पिण्याकरिता बाहेरून पाणी विकत आणावे लागत आहे. याचा अधिकचा भुर्दंड या भागातील नागरिकांवर बसत आहे.
शहरातील व्यापारी आणि मजूर वर्गांचा भाग म्हणून या परिसराची ओळख आहे. या भागातील निम्मी लोकसंख्या विलासाचे तर उर्वरीत लोकसंख्या हातमजुरीचे काम करणारे आहेत. नळ योजनेच्या माध्यमातून दूषित पाणी येत असल्याने येथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ज्यांची आर्थिक बाजू भक्कम आहे ते बोहेरून पाणी विकत आणत आहेत. तर हातावर आणून पानावर खाणाºयांकडून याच पाण्याने तहान भागवावी लागत आहे. परिणामी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दूषित पाण्यामुळे कॉलरा, गॅसस्ट्रो सारखे आजार बळावण्याची शक्यता आहे. शहरात गत दोन दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्याने या वातावरणात असे आजार गळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा विचार पालिका प्रशासनाच्यावतीने वेळीच करणे गरजेचे आहे.
शहरातील खोदकामामुळे पाईपलाईन लिकेजची शंका
वर्धा शहरात विविध भागात रस्ते आणि नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना पालिकेच्यावतीने पाहिजे त्या प्रमाणात काळजी घेण्यात येत नाही. हेच काम सुरू असताना पाण्याची पाईप लाईन फुटल्याने नळांना ाढूळ पाणी येत आहे. याची माहिती पालिकेच्या या प्रभागाच्या पदाधिकाºयांना देण्यात आली असून त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. या भागात असलेल्या नागरिकांना मिळत असलेल्या या पाण्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. याचा विचार पालिकेच्यावतीने करणे गरजेचे झाले आहे.

पाणी पुरवठा करताना पालिका प्रशासन कर आकारत आहे. कर भरण्याकडे दुर्लक्ष झाल्यास नळ जोडणी कापल्या जाते. या भागातील शिला इंगळे यांच्या घरच्या नळाला हे दूषित पाणी येत आहे. त्यांनी तशी तक्रार नगरसेवक मिना भाटीया यांच्याकडे केली; मात्र काहीच लाभ झाला नाही.

Web Title: Scorching thighs on cane water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी