लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील आंजी (अंदोरी) येथील वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा होत असल्याची माहिती तहसीलदार राजेश सरवदे यांना मिळाली. माहितीच्या आधारे शनिवारच्या मध्यरात्री छापा टाकला असता वाळू चोरटे पसार झाले. पण नदीच्या पात्रालगतच्या भागामध्ये वाळूसाठा दिसून आला. तो वाळूसाठा जप्त करून तहसीलदार कार्यालयात आणला.जिल्ह्यात वाळूघाटाचे अद्यापही लिलाव झाला नसल्याने वाळू चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे नद्यांना पाणी असले तरीही तराफे (बोट) तयार करून अवैध वाळू उपसा सुरू आहे. देवळी तालुक्यातील वर्धा नदी पात्रात ठिकठिकाणी वाळू माफीयांचा रात्रीच खेळ चालतो. आंजी (अंदोरी) येथेही अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार राजेश सरवदे, नायब तहसीलदार देशमुख, मंडळ अधिकारी धुर्वे, तलाठी ठमके व बनसोड यांनी शनिवारच्या रात्री १.३० वाजता आंजी येथील वर्धा नदी पात्रावर छापा टाकला. परंतु कारवाईची भनक आधीच लागल्याने वाळू चोरटे लगेच पसार झाले. त्यानंतर पथकाने आजूबाजूच्या परिसराचा शोध घेतला असता आंजी येथील शेत शिवारात ३० ते ४० ब्रासचा वाळूसाठा निदर्शनास आला. तो वाळूसाठा जप्त करून तहसील कार्यालयात जमा केला. सर्व वाळू साठा आणल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याचे मोजमाप करून पोलिसांत तक्रार दिली जाणार असल्याचे तहसीलदार राजेश सरवदे यांनी सांगितले.पूर्वीच मिळाली माहिती, म्हणून झाले पसार?एकाही वाळूघाटांचा लिलाव झाला नसला तरी देवळी तालुक्यात ठिकठिकाणी मनमर्जीने उत्खनन करून वाळूची चोरी केली जात आहे. असाच काहीसा प्रकार आंजी (अंदोरी) शिवारात काही दिवसांपासून सुरू होता. अशातच महसूल विभागाने ही कारवाई केली. पण वाळू चोरट्यांना पूर्वीच माहिती मिळाल्याने ते पसार झाल्याची चर्चा परिसरात होत आहे.
आंजी (अंदोरी) येथील शेतशिवारातून वाळूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 5:00 AM
पावसामुळे नद्यांना पाणी असले तरीही तराफे (बोट) तयार करून अवैध वाळू उपसा सुरू आहे. देवळी तालुक्यातील वर्धा नदी पात्रात ठिकठिकाणी वाळू माफीयांचा रात्रीच खेळ चालतो. आंजी (अंदोरी) येथेही अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार राजेश सरवदे, नायब तहसीलदार देशमुख, मंडळ अधिकारी धुर्वे, तलाठी ठमके व बनसोड यांनी शनिवारच्या रात्री १.३० वाजता आंजी येथील वर्धा नदी पात्रावर छापा टाकला.
ठळक मुद्देदेवळी तहसीलदारांची कारवाई : वाळूसाठा तहसीलमध्ये केला जमा, लावल्या जात होता शासनाला चुना