जनतेच्या तक्रारीचा आठवड्यात निपटारा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:00 AM2019-08-25T06:00:00+5:302019-08-25T06:00:23+5:30
ग्रामीण व शहरी भागातील पट्टे वाटपासाठी नवीन शासन निर्णय निघाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकाराप्रमाणे कार्यवाही करुन अतिक्रमणधारकांना जमीनीचे पट्टे वाटपाचा मुद्दा तत्काळ निकाली काढण्यास सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील बेघरांना घरकुलासाठी पट्टेवाटप, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन, रोजगार यासह विविध समस्यांचे शेकडो अर्ज शनिवारी पालकमंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुसºया जनतासंवाद कार्यक्रमात प्राप्त झाले. नागरिकांनी आपल्या समस्या मांडून न्याय देण्याची मागणी केली. यावेळी नियमानुसार प्रत्येक अर्जावर आठवडाभरात कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. सुमारे तीन तासापर्यंत पालकमंत्र्यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारली. यावेळी आमदार डॉ.पंकज भोयर यांच्यासह जिल्हाधिकारी विवेक भीमनवार आणि सर्व विभागातील प्रमुख अधिकाºयांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात नागरिकांनी दिलेले सर्व निवेदने संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे कारवाईसाठी पाठविण्यात आले. ज्या समस्या स्थानिक पातळीवर सुटणार नाही व धोरणात्मक विषयांचे अर्ज मुंबई येथे पाठवून त्या समस्यांवर मुंबईत बैठक घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.
ग्रामीण व शहरी भागातील पट्टे वाटपासाठी नवीन शासन निर्णय निघाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकाराप्रमाणे कार्यवाही करुन अतिक्रमणधारकांना जमीनीचे पट्टे वाटपाचा मुद्दा तत्काळ निकाली काढण्यास सांगितले. मोहता मिलमधील अनेक कामगारांचे हजेरी पट ठेवले जात नाहीत. तसेच कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात येते, अशी तक्रार मोहता मिलच्या कामगारांनी दिली. याबाबत माहिती घेऊन तोडगा काढण्याची हमी त्यांनी दिली.
सामान्य रुग्णालयात शल्यचिकित्सक यांनी २६ ला बैठक घ्यावी. तसेच दिव्यांगांना प्राथमिकतेने सुविधा देण्याबाबत सांगितले. आलेल्या अर्जावर आठ दिवसात कार्यवाही करुन त्याची माहिती तक्रारदाराला लेखी कळवावी. एखाद्याचे काम नियमात बसत नसेल तर तेही लेखी कळवून अर्ज निकाली काढावा, अशा सूचनाही पालकमंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित सर्व अधिकाºयांना दिल्या आहे.