महिलांचे लैंगिक शोषण ही एक मनोसामाजिक विकृती

By admin | Published: March 1, 2017 01:00 AM2017-03-01T01:00:57+5:302017-03-01T01:00:57+5:30

महिलांचे लैंगिक शोषणाच्या घटना समाजात या अचानक घडत नाही तर यास समाजात निर्माण झालेली अनैतिकता,

Sexual exploitation of women is a psychosocial disorder | महिलांचे लैंगिक शोषण ही एक मनोसामाजिक विकृती

महिलांचे लैंगिक शोषण ही एक मनोसामाजिक विकृती

Next

क्षिप्रा सिंघम : महिला तक्रार निवारण समितीची स्थापना, कार्यशाळेत ६०० मुला-मुलींचा सहभाग
वर्धा : महिलांचे लैंगिक शोषणाच्या घटना समाजात या अचानक घडत नाही तर यास समाजात निर्माण झालेली अनैतिकता, मूल्यहिन तत्व सोबतच संस्कारहीन शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे. ही एक मनोसामाजिक विकृती आहे. मुलींचे होणारे लैंगिक शोषण आज चिंंतनाचा विषय बनला आहे. याबाबत समाजात जागृती घडवून न आणल्यास मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात, असे मत प्रा. क्षिप्रा सिंघम यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र महिला राज्य आयोग मुंबई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ कायद्याबद्दल जाणीव जागृतीसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रा. उज्वला महल्ले, प्राचार्य डॉ. प्रशांत कडवे, प्रा. कांचन इंगोले, प्रा. वैभवी उघडे आदी उपस्थित होते.
द्वितीय सत्रापूर्वी महाविद्यालयीन लैंगिक छळ समाज जागृती विषयावर लघु नाटीका सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती व्हावी म्हणून लघुपट दाखविण्यात आला. द्वितीय सत्रात महिलांना त्यांच्या लैंगिक शोषणाबाबत, त्याचा प्रतिकार करण्यासाठी सदैव सजग राहावे. शोषणाविरूद्ध कायदेविषयक तक्रार आदी बाबींची माहिती करून घ्यावी, असे सांगितले. याप्रसंगी त्यांनी मुलींना सादरीकरणाच्या माध्यमातून लैंगिक छळाविरूद्ध कायदा २०१३ ची सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने लैंगिक छळ म्हणजे काय, यामध्ये शारीरिक स्पर्श, लैंगिक प्रकारातील बोलणे, कामामध्ये लुडबूड करणे, लैंगिक साहित्य सामुग्री दाखविणे, शिव्या देणे, शिट्टी वाजवणे, स्त्री सन्मानाला धक्का पोहोचेल, असे विनोद व संदेश पाठविणे, एखाद्या स्त्री, मुलीला पाहून गाने म्हणने, द्विअर्थी उच्चारणे, कामाच्या ठिकाणी भितीदायक वातावरण तयार करणे, अमानवी व्यवहार करणे, अपमानास्पद वागणूक देणे, ज्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर व सुरक्षेतेवर परिणाम होईल आदी बाबींचा अंतर्भाव असल्याचे प्रा. उज्वला महल्ले यांनी सांगितले. या विरोधात विद्यार्थ्यांनी किंवा महिलेने दिलेली तक्रार व पुरावे खोटे आढळून आल्यास तक्रारदाराविरुद्ध कामाच्या सेवा नियमावलीनुसार कार्यवाईची तरतूद असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी कार्यशाळा आयोजिका प्रा. कांचन इंगोले यांनी समाजाच्या विकासात पुरूषांइतकेच स्त्रियांचेही योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे समाजातील पुरूषांचा समाजातील असलेल्या स्त्रियांप्रती सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. प्राचार्य डॉ. प्रशांत कडवे यांनी महाविद्यालयात स्थापन केलेल्या अंतर्गत निवारण समितीबाबत मार्गदर्शन केले.
संचालन प्रा. जाधव यांनी केले तर आभार प्रा. इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. वैभवी उघडे, प्रा. वंदना पळसापुरे, प्रा. स्वाती लांबट, प्रा. ज्ञानेश्वर बहुरुपी, प्रा. प्रफुल अंबोरे, प्रा. अमित रोंघे, प्रा. प्रमोद आचेगावे, प्रा. प्रमोद तडस, प्रा. पुजा भोयर, प्रा. झा, प्रा. पवार, प्रा. काळे, प्रा. वरडकर, प्रा. सोनटक्के आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Sexual exploitation of women is a psychosocial disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.