८८० परीक्षार्थ्यांची हजेरी : सुविधांकडे शिक्षकांचे लक्ष वर्धा : शालेय परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणारी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी शालांत परीक्षा मंगळवारी शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर सुरळीत वेळेवर सुरू झाली. मराठी, हिंदी व उर्दू प्रथम भाषा विषयाच्या पेपरला दोन्ही केंद्र मिळून ८८० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. आज पहिल्या दिवशी शहरातील आर.के. हायस्कूल व श्रीमती कृष्णा तायल या दहावीच्या दोन्ही केंद्रांवर सकाळी १०.३० वाजता अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसह परीक्षा केंद्राच्या बाहेर पालकांच्या शुभेच्छा स्वीकारत परीक्षा केंद्रात पोहोचले. कृष्णा तायल हायस्कूल केंद्रावर ३६० विद्यार्थी परीक्षा देत होते. या केंद्रावर संस्थेच्या प्राचार्य अपर्णा घोष, केंद्र प्रमुख तर मनीषा देशमुख हे उपक्रेंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आर.के. हायस्कूल या परीक्षा केंद्रावर १७ वर्ग खोल्यांतून ५२० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या केंद्रावर संजय सहारे हे केंद्र प्रमुख तर आर.एस. कदम हे उपकेंद्र प्रमुख आहे. दोन्ही परीक्षा केंद्रावर इंग्रजी, गणित विषयाच्या दिवशी सुमारे एक हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आज परीक्षा सुरळीत सुरू झाली.(तालुका प्रतिनिधी)
दोन परीक्षा केंद्रांवर दहावीच्या परीक्षेला सुरळीत प्रारंभ
By admin | Published: March 08, 2017 1:59 AM