२८ गावांतील सौरऊर्जेवरील पथदिवे निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 05:00 AM2020-03-06T05:00:00+5:302020-03-06T05:00:26+5:30
स्मशानभुमी, बाजारवाडी, देवस्थान, जिथे वीज नाही अशा काळोखात कामाच्या ठिकाणी दिवे ग्रामपंचायत प्रशासनतर्फे लावण्यात आले. परंतु चार सहा महिन्यातच सदर सौरदिवे शोभेची वस्तू झाले. एकदा सौरदिवे लावण्याच काम झाले की त्यानंतर याच्या देखभालीसाठी कोणतीही यंत्रणा तेथे जात नाही. बॅटरीमधील अॅसिड संपले की सौरदिवे बंद पडतात. काहींचे पावसामुळे, वाऱ्यामुळे लाईट निकामी होतात. याकडे कोणीच लक्ष देत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा नाही अशा निर्जनस्थळी समाजकल्याण विभागातर्फे सौरउर्जेवरील सौरदिवे लावण्यासाठी ग्रामपंचायतला देण्यात आले. गिरड क्षेत्रातील २८ गावांमध्ये सौर दिवे लावण्यात आले ते निकामी झाले आहे. त्यामुळे या गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
स्मशानभुमी, बाजारवाडी, देवस्थान, जिथे वीज नाही अशा काळोखात कामाच्या ठिकाणी दिवे ग्रामपंचायत प्रशासनतर्फे लावण्यात आले. परंतु चार सहा महिन्यातच सदर सौरदिवे शोभेची वस्तू झाले. एकदा सौरदिवे लावण्याच काम झाले की त्यानंतर याच्या देखभालीसाठी कोणतीही यंत्रणा तेथे जात नाही. बॅटरीमधील अॅसिड संपले की सौरदिवे बंद पडतात. काहींचे पावसामुळे, वाऱ्यामुळे लाईट निकामी होतात. याकडे कोणीच लक्ष देत नाही.
अनेक गावांतील ५० टक्के बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहे. लाखों रुपयांचा खर्च शासनातर्फे या सौरदिव्यावर खर्च केला गेला परंतु याच्या देखभालीसाठी प्रशासनाने हात झटकले आहे. त्यामुळे सौरदिवे धुळखात पडुन आहे.
ग्रामसभेत वारंवार तक्रारी येऊन सुध्दा संबंधीत अधिकारी याकडे लक्ष देत नाही.सदर सौरदिवे पुर्ववत सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
माझ्या वार्डात १० च्या वर सौरदिवे आहे परंतु त्यामधील बॅटरीतील अॅसिड कमी झाल्याने आणि लाईट खराब झाल्याने ते बंद पडून आहे. वारंवार तक्रारी करून सुध्दा अधिकारी लक्ष देत नाही
-हमीद पटेल, ग्रा.पं.सदस्य वार्ड क्रमांक २ गिरड