लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : राष्ट्रपती रामनाथ कोविंद बापूंच्या येथील आश्रमात आले होते. यावेळी त्यांनी चंदनाचे झाड लावले. आश्रमात आले असता त्यांना जी सुरक्षा होती, तशीच काहीशी त्यांनी लावलेल्या झाडालाही कडक सुरक्षा प्रदान केल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रपती कोविंद १७ ऑगस्ट २०१९ रोजी महात्मा गांधीजींच्या आश्रमात आले होते. महादेव कुटीसमोरील जागेवर त्यांच्या हस्ते चंदनाचे झाड लावण्यात आले.आश्रमाच्या परंपरेत वृक्षारोपण करण्याची पद्धती आहे. देशातील प्रमुख नेत्यांनी तसेच राष्ट्रीय महापुरुषांनी झाडे लावल्याचे आश्रमात दिसून येते. झाडे आश्रमचे वैशिष्ट्यच नाही तर पर्यावरण रक्षणाचा संदेशही येथून दिला जात आहे. आश्रमात वृक्षारोपण करण्यात आल्यानंतर बल्ली आणि बांबूच्या कमच्यांचा कठडा तयार करून लावले जातात. आतापावेतो जे वृक्षारोपण करण्यात आले, यात सर्वांत जास्त याच झाडाला संरक्षित करण्यात आल्याचे दिसून येत आहे असून लक्ष वेधून घेत आहे. वृक्षावर आश्रमात अधिक काळजी घेत असल्याने असंख्य झाडे चांगले बहरल्याचे दिसत आहे.आश्रमातील झाडे पर्यटकांना मात्र वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देत आहे जी काळाची गरज आहे.
राष्ट्रपतींनी लावलेल्या वृक्षाला कडक सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 5:00 AM
आश्रमाच्या परंपरेत वृक्षारोपण करण्याची पद्धती आहे. देशातील प्रमुख नेत्यांनी तसेच राष्ट्रीय महापुरुषांनी झाडे लावल्याचे आश्रमात दिसून येते. झाडे आश्रमचे वैशिष्ट्यच नाही तर पर्यावरण रक्षणाचा संदेशही येथून दिला जात आहे. आश्रमात वृक्षारोपण करण्यात आल्यानंतर बल्ली आणि बांबूच्या कमच्यांचा कठडा तयार करून लावले जातात.
ठळक मुद्देसेवाग्राम आश्रम : चंदनाच्या वृक्षरोपाची केली होती लागवड, पर्यावरण रक्षणाचा संदेश