जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी
By admin | Published: March 1, 2017 01:03 AM2017-03-01T01:03:25+5:302017-03-01T01:03:25+5:30
मंडळ कृषी अधिकारी खरांगणा यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध कामांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
आर्वी : मंडळ कृषी अधिकारी खरांगणा यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध कामांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी पाहणी केली. काम व्यवस्थित असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षांतील विविध मंजूर व कार्यारंभ आदेश दिलेली नाला खोलीकरण व सिमेंट नाला बांध कामे मंडळ कृषी अधिकारी खरांगणा यांच्या कार्यक्षेत्रात सुरू आहे. भारती यांनी हमदापूर येथील नाला खोलीकरण कामास भेट देत पाहणी केली. मागेल त्याला शेततळे योजनेत मार्डा येथील शेततळ्यास भेट देत पाहणी केली. २३ शेततळ्याची कामे पूर्ण झाली असून ५ कामे प्रगतिपथावर आहे. यामुळे विहिरींच्या पातळीत वाढ होऊन ओलित क्षेत्र वाढेल, असे शेतकऱ्यांना सांगितले. आॅनलाईन प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. विरूळ येथील कृष्णाजी शेंडे यांच्या मोसंबी पिकांची १ हेक्टर क्षेत्रावर केलेली लागवडीची पाहणी करून मार्गदर्शन केले.(शहर प्रतिनिधी)