शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
3
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
4
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
5
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
6
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
7
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
8
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
9
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
10
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
11
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
12
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
13
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
14
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
15
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
16
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर
17
दुसऱ्या पत्नीला प्रॉपर्टीत अधिकार मिळतो का? पतीच्या मालमत्तेचे खरे वारसदार कोण? काय आहे कायदा?
18
Adani Group Stocks: 'या' सेगमेंटमध्ये अदानींच्या शेअर्सची एन्ट्री; ३ शेअर्सनं पकडला तुफान स्पीड, तुमच्याकडे आहे का?
19
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
20
नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."

‘ते’ पिंपळाचे झाड चौकशीच्या भोवऱ्यात

By admin | Published: May 25, 2015 2:12 AM

शासकीय कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत लिलाव घेत तोडलेले पिंपळाचे झाड चौकशीच्या भोवऱ्यात आले आहे.

घोराड : शासकीय कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत लिलाव घेत तोडलेले पिंपळाचे झाड चौकशीच्या भोवऱ्यात आले आहे. या प्रकरणात लिलावाच्या पहिलेच झाडाची तोडलेली लाकडे परत नेण्याचे पत्र आल्याने अनेक चर्चेला उधान आले आहे. नजीकच्या वाहितपूर येथील पिंपळाचे झाड अनेकांच्या अंगलट येणार आहे. याप्रकरणी योग्य चौकशी केली जात नसल्याचा आरोप होत आहे.वाहितपूर येथील कोंडवाड्याच्या जागेवर असलेले पिंपळाचे झाड तोडून ग्रामपंचायतकडून यात अफरातफर झाल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे एका ग्रामपंचायत सदस्याने केली. यावर विस्तार अधिकाऱ्याने दिलेला अहवाल हा एकतर्फी असून प्रमुख मुद्दावर चौकशीच झाली नसल्याने पुन्हा चौकशीची मागणी केली. ही चौकशी नावापुरतीच झाल्याची शंका व्यक्त होत आहे. झाडाचा लिलाव १० डिसेंबरला करण्यात आला. असे असताना त्यापूर्वीच ३ डिसेंबरला झाडाची वाहतूक करण्याचा परवाना तयार करण्यात आला. यात वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव, झाडे कोणत्या मार्गाने नेणार आहे याची माहिती नमूद आहे. यामुळे झाडाची अवैध कत्तल करण्यात आल्याची चर्चा जोर धरत आहे. लिलावाच्या दिवशी शासनाचा प्रतिनिधी असलेले ग्रामसचिव हजर नव्हते, असा आरोप ग्रा.पं. सदस्यांनी केला आहे. मुख्य मुद्याला चौकशी अधिकारी बगल देत असल्याचा आरोप करीत ग्रा.पं. सदस्य लुकेश लोटे यांनी उपकार्यपालन अधिकाऱ्यांकडे केला आहे. लिलावाच्या दिवशी असलेली ग्रामसभा तहकुब झाली होती. ग्रामसभेला सचिव हजर होते; परंतु प्रकृती ठिक नसल्याने ते लिलावाला गैरहजर असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. सरपंच व लिलाव घेणाऱ्याचे बयाण ग्रामपंचायत रेकॉर्डनुसार जुळत आहे. त्यामुळे हा लिलाव योग्य असल्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी दिला आहे. बयाण जुळत असले तरी तक्रारकर्त्यांचे मुद्दे वेगळेच राहिले असून यात हयगय झाल्याची चर्चा होत आहे. (वार्ताहर)