आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह लगतच्या १४ गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता सध्या धामनदीपात्रातूनच पाण्याची उचल केली जात आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या पाणीबाणीमुळे पाण्याचा होणारा अपव्यय टाळून गावांना मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी महाकाळीच्या धाम प्रकल्पापासून पवनारपर्यंत जवळपास ३६ किलोमीटरची गुरुत्व वाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.महाकाळी येथील धाम प्रकल्पातून धामनदीद्वारे वाहणाऱ्या पाण्यातूनच पात्रा लगतच्या काचनूर, खरांगणा, मोरांगणा, कासारखेडा, सावद, मजरा, कामठी, खैरी, आंजी (मोठी), डोरली, धुळवा, सुकळी व खेरडा या गावांसह वर्धाशहर व लगतच्या १४ गावांना दररोज पाणी पुरवठा होत आहे. गेल्यावर्षी धाम प्रकल्पाच्या मृत जलसाठ्यातून पाणी उचलण्याची वेळ आली होती. पाण्याची ही भीषणता लक्षात घेता नदीपात्राव्दारे वाहणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे जवळपास ७० टक्के पाणी वाया जाते. भूगर्भातील जलपातळी लक्षात घेता आता धामप्रकल्पातून पवनारपर्यंत गुरुत्व वाहिनी टाकून पात्रालगतचे १३ गावे, शहरालगतसह लगतची १४ आणि पवनार या २८ गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. जलशुद्धीकेंद्रापर्यंत पाईपलाईनचे काम प्रस्तावित असल्याने पाण्याची गळती थांबणार आहे. असे असले तरीही या पाइपलाईनच्या शेजारी असणाºया गावांना या गुरुत्व वाहिनीमुळे मोठा फटका बसणार असल्याचेही मत नदीपात्रालगतच्या गावातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.या जलवाहिनीचा नदीपात्रालगतच्या व आजुबाजुच्या परिसरातील शेतकरी, नागरिक व गोपालकांना मोठा फटका बसणार आहे. दुष्काळ काही वांरवार पडत नाही. शहराची तहाण भागविण्यासाठी ग्रामीण भागावर हा अन्याय आहे. याकरिता वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करु.- राजश्री राठीजि.प.सदस्य मोरांगणावर्ध्यासह लगतच्या १४ गावांना उन्हाळ्यात पाण्याची संमस्या जाणवतात. आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. गेल्या उन्हाळ्यात १५ दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला. भीषणता लक्षात घेऊन पाणी बचतीकरिता ही वाहिनी महत्वाची ठरेल.- अजय गौळकरसरपंच, पिपरी(मेघे)गेल्या उन्हाळ्यात धाम प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर येळाकेळी व पवनारपर्यंत केवळ ४० टक्केच पाणी पोहोचत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने टंचाई जाणवली. आता या वाहिनीमुळे कुणाचेही नुकसान होणार नाही. यात फायदाच आहे.- अतुल तराळेनगराध्यक्ष, वर्धाधाम ही बारमाही वाहणारी नदी आहे. या जलवाहिनीमुळे नदीपात्रालगतच्या गावांना मुळीच नुकसान होणार नाही. वाहिनी टाकतानाच धाम प्रकल्पाच्या उपपाणलोटाचा विकास महत्वाचा आहे. त्यामुळे नदी पुनर्जीवित होईल.- माधव कोटस्थाने , जलतज्ज्ञ, वर्धा.
धाम ते पवनारपर्यंतची ‘गुरुत्व वाहिनी’ भागविणार वर्ध्यासह २८ गावांची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 5:00 AM
महाकाळी येथील धाम प्रकल्पातून धामनदीद्वारे वाहणाऱ्या पाण्यातूनच पात्रा लगतच्या काचनूर, खरांगणा, मोरांगणा, कासारखेडा, सावद, मजरा, कामठी, खैरी, आंजी (मोठी), डोरली, धुळवा, सुकळी व खेरडा या गावांसह वर्धाशहर व लगतच्या १४ गावांना दररोज पाणी पुरवठा होत आहे. गेल्यावर्षी धाम प्रकल्पाच्या मृत जलसाठ्यातून पाणी उचलण्याची वेळ आली होती
ठळक मुद्देमहाकाळीच्या प्रकल्पातून शहरासह लगतच्या गावांना होतोय पाणीपुरवठा