देशीकट्टा बाळगणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 08:58 PM2019-01-02T20:58:19+5:302019-01-02T20:58:51+5:30

खात्रिदायक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाला ताब्यात घेवून त्याच्याकडून देशीकट्ट्यासह ुदोन जीवंत काडतूस जप्त केले आहे. प्रविण उर्फ डोगा अशोक शेंडे (३०) रा. पुलफैल, ह.मु.नागसेननगर वर्धा, असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Those who have stashed abroad are arrested | देशीकट्टा बाळगणाऱ्यास अटक

देशीकट्टा बाळगणाऱ्यास अटक

Next
ठळक मुद्देशस्त्रासह दोन जिवंत काडतूस जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खात्रिदायक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाला ताब्यात घेवून त्याच्याकडून देशीकट्ट्यासह ुदोन जीवंत काडतूस जप्त केले आहे. प्रविण उर्फ डोगा अशोक शेंडे (३०) रा. पुलफैल, ह.मु.नागसेननगर वर्धा, असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एक ३० वर्षीय तरुण देशी बनावटीची पिस्टल बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी प्रफुल बडगे यांच्या घरी किरायाने राहणाºया प्रविण शेंडे याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने आपण पिस्टलसारखे शस्त्र अवैध पद्धतीने बाळगत असल्याचे कबूल केले. प्रविण शेंडे याच्याविरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. परंतु, सध्या तो दारूविक्रीचा व्यवसाय करीत नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. परंतु, सदर शस्त्राचा वापर कुणाच्या जीवावर बेतू शकत असल्याने पोलिसांनी आपल्या हालचालींना वेग देत प्रविण शेंडे याला ताब्यात घेतले. त्याच्या घराच्या झडतीत एक गावठी बनावटीचा लोखंडी देशीकट्टा तसेच अग्नीशस्त्राचे मॅग्झीन खोलून पाहणी केली असता त्यात दोन जीवंत पितळी काडतूस आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले आहे. शिवाय आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, स.फौ. नामदेव किटे, पो.ह.वा. नरेंद्र डहाके, हरिदास काकड, वैभव कट्टोजवार, अमीत शुक्ला, सचिन खैरकार, विलास लोहकरे यांनी केली. विना परवाना देशीकट्टा सारखे प्राणघातक शस्त्र बाळगणे हे कायद्यान्वये गुन्हा असून ते बाळगू नये असे आवाहन केले आहे.

Web Title: Those who have stashed abroad are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.