ट्रान्सफॉर्मरच्या आगीने वीज पुरवठा प्रभावित

By admin | Published: September 20, 2016 01:11 AM2016-09-20T01:11:00+5:302016-09-20T01:11:00+5:30

बोरगाव (मेघे) लगतच्या सिद्धार्थ नगर येथील २२० केव्हीच्या सबस्टेशनला सोमवारी आग लागताच शहरात

Transformers fire affecting power supply | ट्रान्सफॉर्मरच्या आगीने वीज पुरवठा प्रभावित

ट्रान्सफॉर्मरच्या आगीने वीज पुरवठा प्रभावित

Next

बोरगाव येथील सबस्टेशनला आग : दुरूस्तीच्या कामात पावसाचा खोडा; वर्धा शहरात काळोख
वर्धा : बोरगाव (मेघे) लगतच्या सिद्धार्थ नगर येथील २२० केव्हीच्या सबस्टेशनला सोमवारी आग लागताच शहरात एकच कल्लोळ माजला. या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सबस्टेशनच्या दिशेने धाव घेतली. पाहता पाहता अख्खे बोरगाव व वर्धा शहरातील नागरिक या केंद्राच्या आवाराजवळ उभे झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. यामुळे वर्धा शहरासह आसपासच्या गावातील वीज पुरवठा काही काळाकरिता प्रभावित झाला होता. सायंकाळी निम्मे वर्धा शहर काळोखात बुडाले होते.
या आगीचे लोळ वर्धा शहरातील सोशालिस्ट चौकातून दिसत होते. एवढे मोठे लोळ कशाचे, असे भाव शहरवासीयांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हे लोळ कशाचे पाहण्याकरिता सारेच त्या दिशेने धावू लागले. नागरिकांचा वाढता लोंढा व कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलीस ताफाही दाखल झाला होता. आग आटोक्यात आणण्याची स्थिती असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस आला. असे असतानाही महावितरणचे कर्मचारी व अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. आग आटोक्यात येईपर्यंत वर्धा शहरात काही भागात काळोख होता.
आग आटोक्यात आल्यानंतर व पावसाचा जोर ओसरताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी देवळी व भूगाव येथील केंद्रावरून वर्धेकरांकरिता विजेची उपलब्धता करून दिली. तसेच या केंद्रातून यवतमाळ जिल्ह्यात जात असलेला वीज पुरवठा हिंगणघाट व वरोरा येथील केंद्रावरून सुरळीत करण्यात आल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली.(प्रतिनिधी)


आगीवर नियंत्रणाकरिता अग्निशमन दलाची धावपळ
४ट्रान्सफार्मरच्या आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता वर्धेसह पुलगाव, देवळी, हिंगणघाट नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या मदतीला उत्तम गल्वा आणि पुलागव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पुलगाव येथील दोन अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. या दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

दुरूस्तीचा कालावधी अनिश्चित
४या आगीत कोळसा झालेले ट्रान्सफार्मर किती दिवसात दुरूस्त होईल, याचा कालावधी निश्चित नाही. यामुळे नागरिकांना इतर केंद्रावरून पर्यायी व्यवस्था करून वीज देण्यात येत आहे. ही वीज कोणत्याही क्षणी बंद वा चालू होण्याची शक्यता आहे.
४आपला विद्युत पुरवठा कायम राहावा, याकरिता नागरिकांनी वीज वापर कमी करावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे. जळालेले ट्रान्सफार्मर सुरू होताच वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे महावितरणच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Web Title: Transformers fire affecting power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.