थाळी वाजवून नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:15 PM2018-12-12T23:15:07+5:302018-12-12T23:15:43+5:30
वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीच्या नेतृत्त्वात कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीच्या नेतृत्त्वात कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. सदर आंदोलन मागील ११ दिवसांपासून सुरू असताना संबंधितांकडून मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत बुधवारी आंदोलनाच्या बाराव्या दिवशी आंदोलनकर्त्या ठेकेदारांनी थाळी बाजवून सुस्त प्रशासनाच्या दुर्लक्षी धोरणांचा निषेध नोंदविला.
विविध योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांचे थकीत असलेले ३५.४० कोटी तात्काळ अदा करण्यात यावे. क्रेशर सॅँड लहान कंत्राटदारांना वापरण्यास मनाई असून फक्त मोठ्या कामासाठी त्याची परवानगी देण्यात यावी. जिल्ह्यातील रेतीघाट सुरू नसल्याने कंत्राटदाराची कामे थप्प आहेत. रेतीघाटाचे लिलाव लवकरात लवकर करण्यात यावे. डांबरीकरणच्या एस.एस. आर. रेट मध्ये फार तफावत आहे असून ५० लाखपर्यंत कामाच्या रॉयल्टी पासेस आॅफीसमध्ये जमा करण्यात याव्यात. आदिवासी व महसूल विभागाच्या कामाची अनामत रक्कम जमा झाल्या शिवाय निविदा काढू नये. १ कोटीपर्यंत कामावर अटी व शर्ती टाकू नये. लहान कामाचे क्लम्बींग करण्यात येवू नये. कररानाम्याच्या अनुसार कंत्राटदारांना मासीक देयके देण्यात यावे. इन्शुरन्सचे कार्यालय नागपूरमध्ये देण्यात यावे. मुदतवाढ पर्यंत विम्याचे कवच देण्यात यावे. कंत्राटदाराची कामे पूर्ण होवूनही ३ वर्षापासून अंतिम देयके दिली नाही ती देण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत काम करणाऱ्या कंत्राटदाराला रेतीघाट देण्यात यावे, या मागण्यांकडे बुधवारी थाळी वाजवून आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने लक्ष वेधले. सदर आंदोलनात कंत्राटदार कल्याण समितीचे अध्यक्ष किशोर मिटकरी, एस. बी. सिंग, राजू वानखेडे, नंदकिशोर थोरात, शैलेंद्र झाडे, विशाल व्यास, रवी ऐकापूरे, विजय लांबाडे, हेमंत नरहरशेट्टीवार, अमोल क्षीरसागर, अनिल पशीने, नागेश सरदार, संदीप चौरसीया, बाबा जाकीर, पारस माळोेदे, अवधुत मोने, मुकुंदा झामरे, शकील खान, विनोद भाटीया, संजय हिंगणघाटकर, सचिन बुटे, राजेश पोहरे, शारिक अली यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटदार सहभागी झाले होते.
तोडगा न काढल्यास कुलूप बंद आंदोलन
१ डिसेंबरपासून सा.बां.विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांनी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. बुधवारी आंदोलनाच्या १२ व्या दिवशी मागण्यांवर तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरू होते. वेळीच मागण्यांवर संबंधितांनी तोडगा न काढल्यास अधिकाºयांना कार्यालयात कोंडून कुलूप बंद आंदोलन करण्याचा इशारा किशोर मिटकरी यांनी दिला आहे.