पाच बड्या कंपन्यांवर अडीच कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:33 PM2019-03-17T23:33:56+5:302019-03-17T23:35:51+5:30

जिल्ह्यातील धाम प्रकल्पासह इतर काही प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल काही कंपन्या करतात. या पाण्याच्या मोबदल्यात पाटबंधारे विभाग या कंपन्यांकडून पाणीपट्टी कर घेतो. परंतु, सहा कंपन्यांकडे पाटबंधारे विभागाचा तब्बल २.५६ कोटींचा पाणीपट्टी कर थकीत आहे.

Twenty-two crore outstanding on five big companies | पाच बड्या कंपन्यांवर अडीच कोटींची थकबाकी

पाच बड्या कंपन्यांवर अडीच कोटींची थकबाकी

Next
ठळक मुद्देपाटबंधारे विभाग मार्च अखेरीस करणार पाणी बंद

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील धाम प्रकल्पासह इतर काही प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल काही कंपन्या करतात. या पाण्याच्या मोबदल्यात पाटबंधारे विभाग या कंपन्यांकडून पाणीपट्टी कर घेतो. परंतु, सहा कंपन्यांकडे पाटबंधारे विभागाचा तब्बल २.५६ कोटींचा पाणीपट्टी कर थकीत आहे. हा कर त्यांनी वेळीच न भरल्यास मार्च अखेरीस त्यांचे पाणी पाटबंधारे विभाग बंद करणार असून सध्या त्याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा नगर परिषदेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महात्मा सहकारी साखर कारखाना, उत्तम व्हॅल्यू स्टिल लि.मी., मानस अ‍ॅग्रो इंड्रस्टिज अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. जामणी, उत्तम गाल्वा मेटॅलिक्स लि. भूगाव आदी कंपन्या करून त्याचा वापर करतात. त्यांच्याकडून पाटबंधारे विभाग पाणी पट्टीकर घेतो. परंतु, २८ फेबु्रवारीपर्यंत जामणी येथील महात्मा सहकारी साखर कारखाना ५० लाख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वर्धा ३.१८ लाख, व्यवस्थापक मध्य रेल्वे वर्धा ८.२४ लाख, नगर परिषद वर्धा १४.६२ लाख, मानस अ‍ॅग्रो इंड्रस्टिज अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. जामणी १२७.३४ लाख, ग्रा. पं. पवनार ०.३५ लाख, ग्रा.पं. आंजी ०.९३ लाख, मे. बिल्ट ग्राफिक्स पेपर मिल बल्लारशाह ५७.३९ लाख, नगर परिषद राजुरा ०.९५ लाख, मे. आय.एस.एम.टी. कंपनी केळी ५७.६० लाख, उत्तम गाल्वा मेटॅलिक्स लि. भूगाव ११.९८ लाखांची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले.
थकबाकीदार कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत सदर थकबाकीची रक्कम पाटबंधारे विभागाला अदा न केल्यास त्यांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. त्यासाठीची कागदोपत्री प्रक्रिया सध्या पाटबंधारे विभागाकडून पूर्ण केली जात असून पाणी बंद केल्यास या कंपन्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या विषयी लक्ष देण्याची गरज आहे.

सिंचनाची १० लाख तर बिगर सिंचनाची ४ लाख कोटी वसुली
पाटबंधारे विभागाला यंदाच्या वर्षी पाणीपट्टी कराची सिंचनाच्या वसुलीचे ४० लाखांचे तर बिगर सिंचनाच्या वसुलीचे ३.५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर पाटबंधारे विभागाने २८ फेब्रुवारीपर्यंत बिगर सिंचनाची ४ कोटींची तर सिंचनाची १० लाखांची वसुली केली आहे.

विविध कंपन्यांवर पाणीपट्टी कराची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यांनी वेळीच कराचा भरणा करावा, यासाठी त्यांना वेळोवेळी सूचना करण्यात आल्या आहेत. कंपन्यांनी वेळीच कर न भरल्यास त्यांचे पाणी बंद करण्याचे विचाराधीन आहे.
- एस. बी. काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा.

Web Title: Twenty-two crore outstanding on five big companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.