वर्ध्यात देवालये झाली खुली, भाविकांनी घेतले शिस्तीत दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 02:33 PM2020-11-16T14:33:53+5:302020-11-16T14:34:19+5:30

Wardha News Temple तब्बल सात महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे सोमवारपासून उघडण्यात आली. दरम्यान पहिल्याच दिवशी भाविकांनी मंदिरात श्री साईबाबांचे शिस्तीत दर्शन घेतले. तत्पूर्वी मंदिर परिसराची सेवाधारींकडून स्वच्छता करण्यात आली.

In Wardha, temples were opened, devotees took darshan in discipline | वर्ध्यात देवालये झाली खुली, भाविकांनी घेतले शिस्तीत दर्शन

वर्ध्यात देवालये झाली खुली, भाविकांनी घेतले शिस्तीत दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देमंदिर परिसराची सेवाधारींकडून स्वच्छता


लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: तब्बल सात महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे सोमवारपासून उघडण्यात आली. दरम्यान पहिल्याच दिवशी भाविकांनी मंदिरात श्री साईबाबांचे शिस्तीत दर्शन घेतले. तत्पूर्वी मंदिर परिसराची सेवाधारींकडून स्वच्छता करण्यात आली.
श्री साईबाबा मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आले. धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी राजकीय पक्षांनी आंदोलने करीत सरकारचे लक्ष वेधले. अखेर महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन काळापासून बंद असलेली धार्मिक आणि प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. सोमवारी मगनवाडी चौक परिसरातील श्री साईबाबा दर्शनाकरिता खुले करण्यात आले. नियम अटी, पाळूनच साईभक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना श्री साईबाबा देवस्थानात करण्यात आल्या आहेत. देवस्थान परिसराचे निजंर्तुकीकरण आणि स्वच्छता करण्यात आली. पहिल्याच दिवशी महिला आणि पुरुष भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली. सामाजिक अंतर राखून श्री साईबाबांचे दर्शन घेतले. साईबाबा मंदिरात प्रत्येक गुरुवारी साईभक्तांची मोठी गर्दी उसळते. कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आल्याने साईभक्तांची घोर निराशा झाली होती. आता सात महिन्यांंनंतर मंदिर उघडण्यात आल्याने भाविकांत आनंद आहे. साई दर्शनाची त्यांना आस लागलेली आहे.

फुल, पूजा साहित्य विक्रेत्यांना दिलासा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल सात महिन्यांपासून मंदिर कुलूपबंद होते. परिणामी, मंदिर परिसरातील फुल आणि पूजा व अन्य साहित्य विक्रेत्यांचेही अर्थचक्र जागीच थांबले होते. त्यांच्यापुढे उदरनिवार्हाचा प्रश्न उभा ठाकला होता. आता मंदिर उघडण्यात आल्याने या लघु व्यावसायिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

घोराडात काकडा आरती मंदिराबाहेरच
घोराड येथील विठ्ठल रुख्माई मंदिर सोमवारी उघडण्यात आले. मात्र, परिसरात शुकशुकाट कायम होता. गत काही दिवसांपूर्वी सुरू झालेली काकड आरती प्रदक्षिणाही मंदिराबाहेरच होती. मंदिर परिकोटाला प्रदक्षिणा घातल्यानंतर पायरीसमोर आरती करून भाविक परतले. पहाटे पाच वाजता मंदिराचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. पहिलाच दिवस असतानाही भाविकांची गर्दी मात्र दिसून आली नाही.

माजी खासदारांच्या हस्ते पूजा
तब्बल सात महिन्यानंतर अल्लीपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उघडण्यात आले. माजी खासदार सुरेश वाघमारे, उपसरपंच विजय कवडे, दामू घुसे, सुनील गुळघाणे यांनी विठ्ठल-रुक्मिणी मूतीर्चे पूजन केले. तर आबाजी महाराज देवस्थानात अध्यक्ष पुरुषोत्तम कवडे, सचिव पुरुषोत्तम वºहाडे, उपसरपंच विजय कवडे यांच्या हस्ते आबाजी महाराज आणि श्रीगणेशाचे पूजन करण्यात आले.

Web Title: In Wardha, temples were opened, devotees took darshan in discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर