आष्टीच्या शहीदभूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:00 AM2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:01:13+5:30
आष्टीमध्ये नागपंचमीच्या दिवशी झालेल्या क्रांती लढ्यात सहा जणांनी बलिदान दिले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कालांतराने त्यांची शिक्षा माफही झाली. उकंडराव सोनवणे यांची अपील लंडनच्या मिली कॉन्सिलमध्ये चालली. इतका महत्त्वपूर्ण इतिहास असूनही या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, पर्यटन म्हणून शासनाने त्याचा विकास करावा, ही मागणी शासनदरबारी धुळखात आहे.
आकाश सव्वालाखे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात नागपंचमीच्या दिवशी आष्टीला रक्तरंजित क्रांती झाली होती. यामध्ये काहींनी हुताम्य पत्कारले तर काहींना जन्मठेप झाली होती. मात्र, या क्रांतीला ७८ वर्षाचा कार्यकाळ लोटला तरीही या शहीद भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कधी मिळेल, असा प्रश्न हुतात्मा स्मारक समितीने, क्रांतीदिनाच्या निमित्ताने उपस्थित केला आहे.
आष्टीमध्ये नागपंचमीच्या दिवशी झालेल्या क्रांती लढ्यात सहा जणांनी बलिदान दिले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कालांतराने त्यांची शिक्षा माफही झाली. उकंडराव सोनवणे यांची अपील लंडनच्या मिली कॉन्सिलमध्ये चालली. इतका महत्त्वपूर्ण इतिहास असूनही या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, पर्यटन म्हणून शासनाने त्याचा विकास करावा, ही मागणी शासनदरबारी धुळखात आहे. क्रांतीस्थळ तेव्हाचे पोलीस स्टेशन तर आताचे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय म्हणून आळखले जाते. स्वातंत्र्यलढ्याचे स्थळ सुरक्षित रहावे म्हणून १९५८ साली येथे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. हुतात्मा स्मारक समितीच्या पुढाकारातून या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू लागले. गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय झालेल्या स्मारक समितीच्यावतीने या ऐतिहासिक स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी लाऊन धरली. आष्टीला पंतप्रधान ते मुख्यमंत्रीपर्यंतच्या मंत्र्यांनी येऊन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे आश्वासनही दिलेत पण, आज ७८ वर्षानंतरही ही क्रांतीभूमी त्यापासून वंचितच आहे.
...तर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल
येथील स्वातंत्र्यलढ्यावरील लघुचित्रपट तयार करण्यात आला. त्याचे शाळा, महाविद्यालय, विधानसभा, विधान परिषद येथे सादरीकरण करण्यात आले. तसेच पंतप्रधानांपासून तर राष्ट्रपतींपर्यंत पोहोचून अरविंद मालपे व भरत वणझारा यांनी राष्ट्रीय स्मारकाची मागणी लावून धरली. पण, अद्याप यश प्राप्त झाले नाही. या स्वातंत्र्यलढ्याला तात्काळ राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिल्यास खºया अर्थाने शहिदांना श्रद्धांजली दिल्याचे सार्थक होईल, असे हुतात्मा स्मारक समितीकडून बोलेले जात आहे.
येथे २६५ दिग्गज झालेत नतमस्तक
दरवर्षी शहीद स्मृतिदिनी (नागपंचमी) शहीदांना श्रद्धांजली अपर्ण केली जाते. या कार्यक्रमाला देशातील दिग्गज मंडळी आष्टीत येतात. आतापर्यंत तब्बल २६५ दिग्गज लोकांनी या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्यासह असंख्य केंद्रीयमंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार, कवी, लेखक आणि प्रतिष्ठित नागरिकांचाही समावेश आहेत.