पती-पत्नीच्या सुंदर नात्यात जीवघेणी हिंसा का वाढतेय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 05:42 PM2024-12-09T17:42:51+5:302024-12-09T17:45:34+5:30

घरोघरी वाढताहेत वाद : 'भरोसा'कडे ११ महिन्यांत १,२३१ तक्रारी; ३२ प्रकरणांत विविध ठाण्यात गुन्हे दाखल

Why is life-threatening violence increasing in the beautiful relationship of husband and wife? | पती-पत्नीच्या सुंदर नात्यात जीवघेणी हिंसा का वाढतेय ?

Why is life-threatening violence increasing in the beautiful relationship of husband and wife?

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
गेल्या काही वर्षांत घरगुती हिंसाचारात वाढ होत आहे. किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमध्ये होणारे वाद इतके विकोपाला जात आहेत की, याचे पर्यवसान हाणामारी आणि अगदी खून करण्यामध्ये होत आहे. ही नात्यातील वाढती हिंसा एक चिंतेची बाब बनली असून, पती पत्नीच्या सुंदर नात्यात इतकी हिंसकता येतेच कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे मागील ११ महिन्यांत १,२३१ तक्रारी दाखल असून, ३२ प्रकरणांत विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


एक काळ असा होता की, पुरुषी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किंवा स्वताचे नैराश्य, अपयश लपविण्यासाठी पती आपल्या पत्नीवर हात उगारत असे. दुर्दैव म्हणजे कुटुंबातील सदस्यांना यात वावगे काहीच वाटत नव्हते. कुणी पुरुषाला अडविण्याचा प्रयत्नहीं करीत नव्हता अजूनही ही स्थिती फारशी बदललेली नाही, मात्र आता एकविसाव्या शतकात सबला पत्नीकडूनदेखील क्षुल्लक कारणावरून मागचा-पुढचा विचार न करता पतीला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, विवाहबाह्य संबंधातून खून करणे, असे प्रकार वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 


नात्या-नात्यात वाढली धोक्याची घंटा 
पती गिफ्ट देत नाही. फिरायला नेत नाही. म्हणून दोन वर्षांपूर्वी पत्नीने पतीच्या नाकावर ठोसा मारला होती. 
दोन दिवसापूर्वीच शहर हद्दीत पत्नीने न सांगता हप्ते भरले म्हणून पत्नीला शिवीगाळ, मारहाण फैल्याची घटना घडली.
ज्यांनी एकमेकांसमवेत आयुष्य घालविण्याची स्वप्न रंगवली तेच एकमेकाना दुखापत करायलादेखील मागेपुढे पाहत नाहीत, ही नात्यासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. यावर विचारमंथन होण्याची गरज आहे.


महिनानिहाय 'भरोसा'त प्राप्त झालेल्या तक्रारी 
जानेवारी - ११५
फेब्रुवारी - ८९
मार्च - १२१
एप्रिल - १०१
मे - १११
जून - १४५
जुलै - १४५
ऑगस्ट - ११२
सप्टेंबर - १०९
ऑक्टोबर - १०४
नोव्हेंबर - ७९


लग्न, संसार म्हणजे काय? 
"याच गोही आला पती-पत्नी विसरत चालले आहेत, मी, माझे आणि मला इतकेच त्यांचे नाते व्यावहारिक झाले आहे. मोवाइलमुळे निर्माण झालेल्या मुलांना भोगावा लागत आहे. विसंवादाचा परिणाम लहान पूर्वी कुटुंबातील सवस्य एकत्रित बसून चहा पित असत. आता चहा पितानाही हातात मोबाइल असतो, अशी स्थिती आहे. पती-पत्नीमध्ये भावनिकता राहिलेली नाही." 
- माधुरी वाघाडे, सहाराक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल


"अनेकदा पती-पत्नीला नात्यात संवादाचा अभाव, विश्वासाचा तुटलेला धागा आणि ताणतणाव यामुळे टोकाच्या घटना घडतात. त्यामागे मानसिक ताण, चिडचिड, किंवा नैराश्य यांचा मोठा वाटा असतो, बायका या पुरुषांना मारत नाहीत है सार्वजनिक सत्य मानणे चुकीचे आहे, कारण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये महिलाही आक्रमक होऊ शकतात. भारतात महिलांसाठी अनेक संरक्षणात्मक कायदे आहेत, जसे घटनेतील कलम ४९८ अ (कॉटुंबिक हिंसेविरुद्ध संरक्षण) परंतु पुरुषांसाठी अशा प्रकारच्या संरक्षणात्मक तरतुदी फारशा उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात महिलांकडून असे प्रकार घडतात." 
- अॅड. मंजुश्री आसोपा,


१,१९० प्रकरणांचा निपटारा, ४१ प्रकरणे प्रलंबित
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत तब्बल १,२३१ तक्रारी दाखल आल्या होत्या. यापैकी १,११० प्रकरणांत भरोसा सेलमधील महिला कर्मचाऱ्यांनी पती-पत्नीचे समुपदेशन करून त्यांचा संसार पुन्हा फुलविला, तर ४१ प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती आहे. 

Web Title: Why is life-threatening violence increasing in the beautiful relationship of husband and wife?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.