वेदनांना मिळाली आसवांतून वाट : अग्निकांडातील १९ व इतर ५ अशा २४ शहीद परिवारांचा भावपूर्ण वातावरणात सत्कारलोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : काळरात्र ठरलेल्या ३१ मे २०१६ ला एक वर्ष पूर्ण झाले. त्या बॉम्बस्फोटाने १९ विरांना कवेत घेत संपूर्ण देशाला हादरा दिला. यात कोट्यवधी रुपयांचा दारूगोळाही नेस्तनाबूत झाला. यातील शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद कृतज्ञता सोहळा बुधवारी सायंकाळी आयोजित होता. ‘शहीद कुटुंबीयांचे शब्द झाले मुके, वेदनांना मिळाली आसवांतून वाट’, अशा भावनाविवष वातावरणात १९ शहिदांसह अन्य पाच अशा २४ शहीद कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. शहरातील विविध संस्था, संघटनांच्या सहकार्याने रंगलाल केजडीवाल हायस्कूलच्या स्मृती मंचावर शहीद दिन समारोह समितीद्वारे ‘एक शाम शहिदो के नाम’ या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, गृहराज्य मंत्री रणजीत पाटील, केंद्रीय दारूगोळा भांडाराचे ब्रिगेडीअर संजय सेठी, माजी खासदार दत्ता मेघे, आ. रणजीत कांबळे, आ.डॉ. पंकज भोयर, आ. अमर काळे, नगराध्यक्ष शीतल संजय गाते, सरपंच सविता गावंडे, आर.के. ट्रस्टचे विश्वस्त मोहन अग्रवाल, लेफ्ट कर्नल जी.एस. संधू, दिलीप अग्रवाल, समितीचे कार्याध्यक्ष अभ्यूदय मेघे आदी उपस्थित होते. देशाच्या विविध राज्यांतून आलेले शहीद कुटुंब, शहर व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते २४ शहीद परिवारांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहीद कुटुंबातील अनेकांनी आसवांना वाट मोकळी केली. अंत्यत नि:शब्द वातावरणात पार पडलेल्या सोहळ्यात अग्निस्फोटातील शिर्षस्थ अधिकारी शहीद लेफ्ट. कर्नल रणजीत सिंग पवार यांच्यावतीने मेजर गौरव मेनन, मेजर मनोज कुमार तर्फे कॅप्टन लव्हासिंग संधू, रणसिंग (हरियाणा) तर्फे वीरपत्नी, भाऊ व परिवार, रामचंद्र शिपाई तर्फे वीरपत्नी कमलेश व मुलगा, सतीश तर्फे सुभेदार शितराम, सत्यप्रकाश कानपूर तर्फे गीता सिंग, बाळू पाखरेतर्फे पत्नी जीजा व मुलगा, लिलाधर चोपडे तर्फे पत्नी शोभा तथा तीन मुलींनी, अमित दांडेकर तर्फे वीरपत्नी प्राची व मुलांनी, अमोल येसनकरतर्फे त्यांचे आई-वडील, अमित पुनिया हरियाणातर्फे वडील संतबीर सिंग पाणीपत, अरविंद सिंग हरियाणातर्फे वडील उमेदसिंग, धमेंद्र सिंग यादवतर्फे वडील कृष्णासिंग, डी.पी. मेश्राम नागपूरतर्फे पत्नी, आई व मुले, क्रिष्णकुमार तर्फे भावांनी, कुलदिप सिंगतर्फे सतबीर सिंग व भाऊ, नवज्योत सिंगतर्फे वडील महिंद्र सिंग व राजपाल सिंग, प्रमोद मेश्राम यवतमाळ यांच्या पत्नी जया व दोन मुली तर शेखर बालस्कर आर्वीतर्फे वडील व भाऊ यांचा सन्मान केला.पुंज सेक्टर राजरी (कश्मीर) येथे शहीद अजय उमरे, थॅँगू (सिक्कीम) येथे शहीद संजय चौधरी, सीआरपीएफ बटालियनचे सोहनसिंह पवार, कारगील युद्धातील क्रिष्णा इमरित व छत्तीसगड येथील सुकमा येथे शहीद प्रेमदास मेंढे यांच्या परिवारांनाही सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक अभ्यूदय मेघे यांनी केले. माजी खा. दत्ता मेघे यांनी मनोगत व्यक्त केले.देशभक्तीपर गीतांनी भारावला परिसरमंचावर २४ शहिदांच्या प्रतिमा व प्रज्वलित अमर जवान ज्योत यांना मानवंदना देताना शहीद कुटुंब व वर्धा स्वरांजली कला मंचाद्वारे सादर देशभक्तीपर गीताने संपूर्ण परिसर भारावला. इंडियन मिलिटरी स्कूलचे प्राचार्य रविकिरण भोजने यांच्या मार्गदर्शनात शाळेतील भावी सैनिकांनी मंचावर सैनिकी प्रथेचा सन्मान राखत मान्यवरांना मार्चपास्ट करीत मंचावर नेत पुष्पचक्र अर्पण केले. आ. कांबळे यांनी सर्वप्रथम पुष्पचक्र अर्पण करीत मानवंदना दिली. यानंतर खा. तडस, नगराध्यक्ष गाते, अभ्यूदय मेघे, आ.डॉ. भोयर, आ. काळे व मान्यवरांनी श्रद्धासुमने वाहिली. सैनिकी प्रथेनुसार बिगुल वाजवून शहिदांना मानवंदना दिली. कल्याणी भांडे हिच्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या स्वरांनी डोळयांत पाणी आणले. यानंतर ‘जो समर मे हो गये अमर’, ‘सारे जहा से अच्छा’, ‘कर चले हम फिदा’, ‘ऐ मेरे प्यारे वतन’, ‘वतन पे जो फिदा हो गया आदी गीतांनी वातावरण भारावले.
कृतज्ञता सोहळ्यात शहीद कुटुंबीयांचे शब्द झाले मुके
By admin | Published: June 02, 2017 2:09 AM