एकही झाड न तोडता रस्ता रुंदीकरणाचे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:00 AM2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:00:37+5:30

सेवाग्राम रस्त्यावर असलेल्या परिसरात अनेक झाडे गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेली आणि जोपासलेली आहेत. मात्र, यासंदर्भात प्रशासन आणि नागरिक यांच्यात पुरेसा संवाद साधण्याची आज गरज आहे. आरती चौक ते वरुड फाटा, सेवाग्राम या भागात १५.५ मीटर रुंदीच्या चौपदरी रस्त्यासाठी सुमारे १६८ झाडे कापण्याची अनुमती दिली गेली आहे. त्यापैकी ७० झाडे कापलेली आहेत.

Work to widen the road without cutting down a single tree | एकही झाड न तोडता रस्ता रुंदीकरणाचे काम करा

एकही झाड न तोडता रस्ता रुंदीकरणाचे काम करा

googlenewsNext
ठळक मुद्देवृक्षप्रेमी आक्रमक : वृक्ष बचाओ नागरिक समितीने मांडली भूमिका, नागरिकांमध्ये जाऊन माहिती देणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एकही झाड न तोडता शक्य तितका रुंद आणि पक्का रस्ता बांधवा, मशीनने केलेल्या खोदकामात मोठ्या वृक्षांच्या मुळा उघड्या पडल्या आहेत त्या झाडांना जगविण्यासाठी उपाययोजना करा, आदी विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी वृक्ष बचाओ नागरिक समितीकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
सेवाग्राम रस्त्यावर असलेल्या परिसरात अनेक झाडे गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेली आणि जोपासलेली आहेत. मात्र, यासंदर्भात प्रशासन आणि नागरिक यांच्यात पुरेसा संवाद साधण्याची आज गरज आहे. आरती चौक ते वरुड फाटा, सेवाग्राम या भागात १५.५ मीटर रुंदीच्या चौपदरी रस्त्यासाठी सुमारे १६८ झाडे कापण्याची अनुमती दिली गेली आहे. त्यापैकी ७० झाडे कापलेली आहेत. रस्ता रुंदीकरणाकरिता मशीनने खोदकाम केल्याने अनेक झाडांच्या मुळ्यांना इजा झाली आहे. त्यांच्यावर तात्काळ उपचार न केल्यास ती झाडेही अल्पावधीतच उन्मळून पडू शकतात. वृक्षतोडीस सुरुवात झाल्यावर नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत रस्त्याच्या रुंदीची मोजणी केली असता दुतर्फा असलेल्या झाडांमधले अंतर ११ मीटर असल्याचे दिसले. हे अंतर १० मीटर (३३ फूट) रुंद रस्ता बांधण्यास पुरेसे आहे. इतक्या रुंदीच्या रस्त्यातून तीन कार किंवा दोन बस-ट्रक सहज जाऊ शकतात. बंगलोर, पुणे, दिल्लीसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरातही जुन्या वृक्षांची जपणूक करुन पक्क्या रस्त्यांची बांधणी केली आहे. वर्ध्यासारख्या शहरातही तसे नियोजन करण्याची गरज आहे. सेवाग्राम रस्त्याच्या दुतर्फा अनेक शाळा, कॉलेजेस, मोठे हॉस्पिटल आणि रहिवासी क्षेत्र आहे. या क्षेत्रात वाहनांचे अतिशय वेगाने धावणे विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या जीवावर बेतणारे आहे. गांधीजींच्या आश्रमाकडे जाणाºया रस्त्याला ‘शांतिपथ’ बनवित मर्यादित वेगाने वाहतूक होणे अपेक्षित आहे.
यासंदर्भात बांधकाम विभागातील अधिकाºयांशी तसेच शासनाच्या वृक्ष सल्लागारांशी चर्चा केली असता त्यांनी हे वृक्ष मुळासकट उचलून दुसºया जागी लावण्यास असमर्थता दर्शवली आहे. नागपूर महामार्ग बनवताना लाखो वृक्षांचा बळी घेण्यात आला. त्या मोबदल्यात किती झाडे लावली आणि किती जगविली ? वर्ध्यासारख्या शुष्क वातावरणात झाडे जगण्यासाठी ५ ते ६ वर्षे त्यांची सतत काळजी घ्यावी लागते. नव्याने केलेल्या वृक्षरोपणाला समितीचा विरोध नाही. पण, जुन्या वृक्षांची कटाई केल्याने होणारी हानी छोट्या रोपट्यांनी कधीच भरून निघत नाही. त्यामुळे हा रस्ता दोन किंवा तीन पदरी ठेवल्यास भविष्यकालीन वाहतुकीवर परिणाम होणार नाही आणि मोठमोठी झाडेही वाचतील, सार्वजनिक हिताचे निर्णय घेताना शासनाने स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्यावे आणि सार्वजनिक कामांचा तपशील जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी वृक्ष बचाओ समितीकडून करण्यात आली आहे.
 

Web Title: Work to widen the road without cutting down a single tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.