पालघर जिल्ह्यात ३१८२ कोविड बेड्स शिल्लक, प्रशासन सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:14 AM2020-12-24T00:14:25+5:302020-12-24T00:14:53+5:30
Palghar : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार १७ इतकी असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४ हजार ६२४ इतकी आहे.
- हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यात सध्या रुग्ण वाढीची संख्या मर्यादित असली तरी महाराष्ट्रात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवघे ३ हजार १८२ बेड शिल्लक आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्याला बेडची आवश्यकता भासणार नाही यासाठी स्वतःची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार १७ इतकी असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४ हजार ६२४ इतकी आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या २८ हजार ९९६ इतकी असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २७ हजार ७५७ इतकी आहे.
दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या असून आम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या काेणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज आहोत. जिल्हा आराेग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे दुसरी लाट आली तरी यंत्रणेच्या दृष्टीने चिंता करण्यासारखी स्थिती नाही.
- डाॅ. अनिल थाेरात,
जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर