४०० टन रासायनिक घनकचरा (स्लज) उघड्यावर पडून
By admin | Published: May 30, 2017 05:09 AM2017-05-30T05:09:26+5:302017-05-30T05:09:26+5:30
तारापूर एमआयडीसी च्या अधिपत्याखाली असलेल्या सम्प नंबर तीन मध्ये वर्षानुवर्षांपासून साचून राहिलेला सुमारे ४०० टन
पंकज राऊत /लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : तारापूर एमआयडीसी च्या अधिपत्याखाली असलेल्या सम्प नंबर तीन मध्ये वर्षानुवर्षांपासून साचून राहिलेला सुमारे ४०० टन रासायनिक घनकचरा (सांड पाण्यातील गाळ/स्लज ) सांडपाण्याचा दर्जा सुधारणयांसाठी तारापुर एनव्हायरोमेन्ट प्रोटेक्शन सोसायटी (टी ई पी एस) ने पुढाकार घेवून बाहेर काढला मात्र तो उघडयावर पडून आहे. पावसाळ्या पूर्वी त्याची विल्हेवाट न लावल्यास पावसाच्या पाण्यासोबत तो खारेकुरण, मुरबा खाडीत वाहून जाण्याची शक्यता आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निर्मित होणाऱ्या सांडपाण्याचा दर्जा न सुधारल्यास राष्ट्रीय हरित लवाद आणि म. प्र. नियंत्रण मंडळा कडून तारापूरच्या उद्योगांवर कारवार्ई होण्याच्या भीतीने सम्प नंबर तीन मध्ये साठून रहिलेला रासायनिक घनकचरा तारापुरचे २०० कारखाने तात्पुरते बंद ठेवून एक जेसीबी व पोकलेन आणि सुमारे १५० कामगार लावून काढण्यात आला आहे. प्लास्टिक वर जमा करून तो सुकविलाही आहे तो मुंबई वेस्ट मैनेजमेंटकडे विल्हेवाटी करीता तातडीने पाठविणे गरजेचे आहे मात्र एमआयडीसी व टीईपीएस या दोन संस्थांमध्ये त्याचा खर्च कोणी करावा या वादामुळे तो सध्या उघडयावरच पडलेला आहे. या स्लज ची तातडीने विल्हेवाट न लावल्यास खारेकुरण मुरबा-खाडीतील मच्छीवर तसेच आरोग्यवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सम्प तीन ७० टक्के गाळाने व्यपाल्याने तसेच पंचवीस वर्षात काढला न गेल्याने त्याचा विपरीत परिणाम सीईटीपीच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पहाणीत निदर्शनास आल्या नंतर त्यांनी टीमा व टीईपीएस यांना सम्प ३ मधील गाळ काढण्यासाठी उपाय योजण्याचे आवाहन केले होते त्या नंतर या दोन्ही संस्थानी पुढाकार घेऊन सम्प तीन मधील गाळ काढला
याबाबत ठोस व जलद निर्णय होणे अपेक्षित आहे नाहीतर हे घोंगडे भिजत राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम मच्छीमारांसह शेतकरी आणि नागरिकांना भोगावा लागेल.
एमआयडीसीने जबाबदारी झटकली
हा घनकचरा एमआयडीसीने तळोजा येथील मुम्बई वेस्ट मॅनेजमेंट ला पाठवावा असे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच टीईपीएसने एमआयडीसीला दिले आहे.
हा मात्र या घनकचऱ्यांची विल्हेवाट तातडीने लावणे एमआयडीसीला शक्य नसल्याने विलंब लागेल. त्यामुळे हे काम टीईपीएसनेच करावे असे एमआयडीसीच्या अधिक्षक अभियंत्यांनी सांगितल्याचे कळते या मुळे एमआयडीसी आपली जबाबदारी झटकू पाहते आहे. हेच सिद्ध होते
आहे.