राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : या तालुक्यातील भाताच्या ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेले चार दिवस झालेल्या पावसामुळे हे शक्य झाले आहे. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यानंतर तीन आठवड्याने तीन दिवस पावसाने सलग चांगली हजेरी लावली. पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी नांगरणीची कामे होती घेतली.मात्र त्यानंतर पावसाने शेतकऱ्यांबरोबर खेळ खेळण्यास सुरुवात केली़ त्यामुळे पेरण्यांची कामे लांबली. आता गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा दमदार पावसाची सुरुवात झाल्याने शेतकरी वेळ वाया न घालवता शेतक-यांनी पेरण्या पूर्ण केल्याने आतापर्यत विक्रमगड तालुक्यात ९० टक्के पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत़ तर लवकर केलेल्या पेरण्यांची रोपे रुजू लागल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे़ त्यामुळे येत्या दोन चार दिवसांत लावणीच्या कामांचा शुभारंग होईल़यावर्षी पावसाच्या भरवशावर न बसता शेतक-यांनी रोहिणीच्या प्रारंभालाच पेरण्यांना प्रारंभ केला होता़ त्यानंतर पावसाचा अनियीमतपणामुळे पुढील पेरण्या उशिराने झाल्या़ मात्र पावसाची सर अधूनमधून येत असल्याने पाउस पडेलच या भरवशावर पुढील पेरण्याची कामे सुरु झाली. कारण जरी पाउस नसला तरी जूनचा शेवटचा व जुलैचा पहिला आठवडा दमदार पावसाचा व भात लावणीचा असल्याने उर्वरीत पेरण्यांची कामे शेतक-यांनी आटोपती घेतली आहेत़. यंदा तालुक्यात ७५५७ हेक्टर क्षेÞत्रावर भाताची लागवड केली जात असून शेतकरी-यांनी कंपनीने तयार केलेल्या वेगवेगळया सुधारीत भात वाणांमध्ये अती हळव्या गटात कर्जत -१८४, रत्नागिरी-२४, हळव्या गटात रत्ना, रत्नागिरी-१, रत्नागिरी-७११, कर्जत-३, कर्जत-४, कर्जत-७, एमटीयू-१०१०, रत्नागिरी-५, निमगरवा गट जया, पालघर-१, कर्जत-५ एमटीयू-१००१, कर्जत-६, एचएमटीसोना, पुसाबासमती-१, इंद्रायणी, गरवागट कर्जत-२, कर्जत-८, सुवर्णा (एमटीयू-७०२९), मसूरी, सांबा मसूरी (बीपीटी-५२०४), श्रीराम, संकरीत वाण पुसा आरएच-१०, संकरित मंगला, संकरित कल्याणी, संकरित सहयाद्री-२, संकरित सहयाद्री-४, संकरित सहयाद्री, संकरित सहयाद्री-३ याप्रमाणे सुधारीत भात बियाणांची लागवड केली आहे़
विक्रमगडात पेरण्या ९० टक्के
By admin | Published: June 28, 2017 3:09 AM